शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परदेशातील भारतीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:04 PM

केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

ठळक मुद्देपालकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी शेकडो पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय) ने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ मे २०१८ रोजी नीट परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. या बाबीचा फटका सन २०१७ मध्ये परदेशात एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना बसणार आहे. विशेषत: अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्स या देशांमध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश प्री-मेडिकल कोर्स गणले जात असल्याने याचा मूळ कालावधी आॅगस्ट २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. तत्पूर्वी एमसीआयने ६ मे रोजी नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सन २०१७ मध्ये नीट परीक्षा उत्तीर्ण करून परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत येऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनी येथे बीएस, एमडी या पाच वर्षीय वैद्यकीय शिक्षणाला भारतात एमबीबीएस म्हणून मान्यता दिली, तर रशिया, चीन व अन्य देशात एमबीबीएस/एमडीला एमबीबीएस म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मात्र, रशिया, चीनमध्ये वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून सूट मिळाली, हे विशेष.रशिया, चीन व अन्य देशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी विज्ञान (पीसीबी) मध्ये ५० टक्के गुण मिळवून एमसीआयचे पात्रता प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, फिलिपाइन्स, अमेरिका व जर्मनीमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुप घेऊनदेखील सन २०१७ मध्ये नीट ब्रेक देऊनही पात्रता प्रमाणपत्र दिलेले नाही. येथे बीएस शिक्षण पूर्ण झाल्यावर एमडी प्रवेश घेतेवेळी एमसीआयचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे आता फिलिपाइन्स येथे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारत सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये सूट देऊन होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.खासदार अडसुळांचे पंतप्रधानांना पत्रभारतातून फिलिपाइन्समध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी सन-२०१७ मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना एमसीआयच्या नीट परीक्षेतून सूट द्यावी, याबाबतचे पत्र अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २६ फेब्रुवारी रोजी दिले. एमसीआयच्या नवीन नियमावलीचा फटका परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून, प्रवेशासाठी अगोदरच पालकांचा बराच खर्च झाल्याचेही नमूद आहे.परदेशात वैद्यकीय उच्च शिक्षणाला अगोरदच नीट परीक्षा देऊनच प्रवेश मिळविला. मात्र, एमसीआयने पुन्हा नीट परीक्षा घेण्याचे निश्चित केल्याने याचा फटका परदेशात गेलेल्या विद्यार्थ्याना बसणार आहे. खासदार अडसुळांमार्फत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन व्यथा मांडू.अरुणा संजय चौधरी, पालक, अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र