लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ग्लोबल एज्युकेशन लि.द्वारा प्रकाशित यूजीसी, नेट/सेट, मराठी पेपर भाग-दोन व जनरल अँड इंजिनीअरिंग जीआॅलॉजी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, ग्लोबल एज्युकेशन लि.चे प्रकाशनप्रमुख विजय श्रीवास व मार्केटिंग एक्झिकेटीव्ह प्रवीण पांडे उपस्थित होते.ग्लोबल एज्युकेशन लि. चे कार्यकारी संचालक आदित्य भंडारी यांच्या मार्गदर्शनात या शैक्षणिक उपयुक्त पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सोपानदेव पिसे यांनी यूजीसी नेट/सेट मराठी पेपर भाग-दोन हे पुस्तक लिहिले असून, नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. मराठी वाङ्मय प्रकार आणि उपप्रकार लक्षात घेता काव्य, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्राबरोबर संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य, लोकसाहित्य, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य, भाषाविज्ञान आणि व्याकरण तसेच इतर सर्वंकष दृष्टिकोनाचा वेध लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.जनरल अँड इंजिनीअरिंग जीआॅलॉजी हे पुस्तक सिव्हील इंजिनीअरिंग, मायनिंग इंजिनीअरिंग, बी.एस्सी. (जीआॅलॉजी), एम.एस्सी. आणि शासकीय व खासगी सिव्हील विभाग यांच्याकरिता उपयुक्त असून आर.के. बोपचे व डी.के. अग्रवाल पुस्तकाचे लेखक आहेत. यूजीसी, नेट/सेटची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यावेळी म्हणाले.
नेट, सेट, यूजीसी मार्गदर्शक पुस्तिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:30 PM
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते ग्लोबल एज्युकेशन लि.द्वारा प्रकाशित यूजीसी, नेट/सेट, मराठी पेपर भाग-दोन व जनरल अँड इंजिनीअरिंग जीआॅलॉजी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना उपयुक्त : मराठी भाषेत प्रकाशन