शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

जिल्ह्यात नवे १५ उद्योग

By admin | Published: December 06, 2015 12:04 AM

पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत.

प्रवीण पोटे : सहा महिन्यांत बेलोऱ्यातून ‘टेक आॅफ’अमरावती : पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत. आणखी १५ उद्योग येणार आहेत. लवकर हे उद्योजक पाहणी करणार आहेत. यामध्ये यवतमाळच्या रेमंड उद्योगाही समावेश आहे. या उद्योगांना शासन सवलती देणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईला बैठक पार पडली असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.अमरावती व कोल्हापूर शहराचा विकास सारखाच झाला. परंतु कोल्हापूर विकासात खूप पुढे गेले, अमरावती मात्र माघारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात शहरात ६५० कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. विकास हा सार्वजनिक असावा यात कुठलेही राजकारण नसावे, असे पालकमंत्री म्हणाले. बेलोरा, अकोला व चंद्रपूर येथून एटीआर व अन्य विमानांचे ६ महिन्यांत ‘टेक आॅफ’ होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यासाठी १३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धावपट्टी बदलणे, टॉवर लाईन अन्यत्र हलविणे आदी कामे होणार आहेत. सिंचनाचे ४० प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत. काही रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विजेची समस्या होती ती मार्गी लागली आहे. आतापर्यंत १०० नवीन रोहीत्र बसविण्यात आलेले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.‘पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान’ राज्यात पायलट प्रोजेक्ट ठरावा, ही संकल्पना‘पालकमंत्री पांदन रस्ते विकास अभियान’ याअंतर्गत जिल्ह्यातील अडीच हजार पांदन रस्ते निर्मितीचे ‘लक्ष्य’ आहे, जिल्ह्यात ४ हजार पांदण रस्ते आहेत. दोन आठवड्यांत २०० रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. जिल्ह्यात ५२५ तलाठी आहे. प्रत्येकांना ५ रस्त्याचे टार्गेट दिले आहे. यासाठी महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांची कार्यशाळा आपण घेतली. ग्रामीण भागात हे रस्ते ‘लाईफ लाईन’ आहे. हे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून मातीकामच नव्हे तर खडीकरण करण्यात येणार आहे. हे अभियान राज्यासाठी पायलट प्रोजेक्ट ठरावा, अशी आपली संकल्पना असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले. प्रत्येक नगरपंचायतींना देणार ६० लाख जिल्ह्यात नव्याने नगरपंचायती स्थापित झाल्यात. यांना शासनाचा निधी नसतो. यासाठी आपण वेगळी योजना आखली आहे. त्या अंतर्गत या नगरपंचायतींना विकासासाठी प्रत्येकी ६० लाख देणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखांचा विकास निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.आतापर्यंत ७८ हजार नागरिकांशी संपर्कपालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारी, रविवारी शासकीय विश्रामगृहात आपण नागरिकांना उपलब्ध असतो. आतापर्यंत ७८ हजार नागरिकांना भेटलो असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे ना.पोटे यांनी सांगितले. ५० हजार युवकांना रोजगार निर्मितीजिल्ह्यात नव्याने उद्योग येत आहेत. यामध्ये किमान ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी कुशल व अकुशल कामगार तयार करणे, प्रशिक्षण देणे यासाठी ना. रणजित पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पोटे यांनी सांगितले.