फोटो : भाकरेंकडे
पान ३ चे लिड
अमरावती : शहरात महापालिकेच्या वाहनतळांची वानवा आहे. त्यामुळे शहरातील सिमेंटचे रस्ते सध्या दुचाकींच्या पार्किंगसाठी सोयीचे ठरले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांवर दुचाकींचे वाहनतळ उभे राहिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. डांबरी रस्त्यावर पावसाळ्यात पडणारे खड्डे, रस्त्यांची दुरवस्था अशी कुठलीही तक्रार सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबाबत नसते. त्या दृष्टिकोनातून निर्मिलेले रस्ते सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे ‘पार्किंग’ स्थळ बनली आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनभरापेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले. पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालवण्यासाठी तयार कलेले रस्ते नसून, गाड्या पार्किंगसाठी केलेली व्यवस्था आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून विचारला जाऊ लागला आहे. शहरात रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. अशा पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेला अडचण होऊन प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यातच शहरातील महत्त्वाच्या पार्किंगच्या काही जागा अतिक्रमितांनी गिळंकृत केल्या आहेत. परिणामी पार्किंगच्या जागांवर अतिक्रमणे केल्यामुळे वाहतूक कोडींच्या समस्येमुळे शहराची घुसमट होऊ लागली आहे.
////////////////
वाहने सुसाट
शहराची लोकसंख्या आजमितीस १० लाखांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनदेखील हजारो लोक विविध कारणांसाठी शहरात येत असतात. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
//////////////////
बॉक्स
येथे लागतात वाहनांच्या रांगा
मालवीय चौक ते राजकमल चौक, अंबादेवी मार्ग, गांधी चौक, चित्रा चौक ते बाजार समिती, विलासनगर ते शेगाव नाका, राजापेठ, बसस्थानक ते रेल्वे स्टेशन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते इर्विन व्हाया मर्च्युरी, जयस्तंभ ते प्रभात चौक, गांधी चौक या भागातील सिमेंट रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागतात.
/////////////
सशुल्क पार्किंग व्यवस्थेची निकड
प्रवाशांशी हुज्जत घालणारे रिक्षाचालक, सिमेंट काँक्रिटीकरणामुळे रस्त्यावर चाललेली खोदकामे आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात जेवढी वाहने आहेत, त्याच्या निम्मीही पार्किंग व्यवस्था नाही. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश वाहने रस्त्यावरच अनेक तास उभी असतात. भविष्यात पार्किंगसंबंधी गंभीर समस्या लक्षात घेऊन पालिकेने सशुल्क पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे.