पान १
तिवसा : येथील एका बारजवळ शनिवारी रात्री शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी लगेच अटक केली. त्या आरोपींना सोमवारी तिवसा न्यायालयात हजर करण्यात आले असता, २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या हत्या प्रकरणाने तिवस्यात नव्या गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे.
मृताचा भाऊ अतुल पाटील (४०, आठवडी बाजार, तिवसा) यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी आरोपी संदीप रामदास ढोबाळे (४२), प्रवीण रामदास ढोबाळे (३५), अवि एकनाथ पांडे (३२), वर्ष, रुपेश ऊर्फ अंकुश रमेश घागरे (२५, रा. सर्व तिवसा) या चाैघांना रविवारीच अटक करण्यात आली. तर गुणवंत उमप (२९, रा. कमळापूर) हा पसार आहे. आतापर्यंत एकही हत्यार पोलिसांना सापडले नाही.
तिवसा तालुक्यात या लॉकडाऊनच्या आठ महिन्यात दोन जणांची हत्या झाली. यात तिवसा येथील अजय दलाल व तारखेड येथील संकेत भगत यांची अवैध धंद्यातून झालेल्या खुनाचा समावेश आहे.
बॉक्स १
आरोपी संदीप ढोबाळे याचे यवतमाळ येथील कुख्यात गुंड दिवंगत प्रवीण दिवटे यांच्यासोबत संबंध होते. संदीप हा दिवटे गॅंग सोबत काम करत होता. तीन वर्षांपूर्वी संदीपने यवतमाळचे काही गुंड आणून तिवसा येथील एका युवकावर प्राणघातक हल्ला करत पेट्रोल पंप चौकात एक दुचाकी पेटविली होती. त्यामुळे एकंदरीत संदीप ढोबाळे हा मोठा गुंडा असल्याने त्याची भीती शहरात आहे. तर त्याचे विरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याने त्याचा जिल्हा बाहेर तडीपाराचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविला आहे.
बॉक्स
ढोबाळेला मिळाले बळ
संदिप ढोबाळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर खून, देशी विदेशी दारूची अवैध विक्री, मारहाण, धमकी देणे, नकली नोटाप्रकरणी वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचा लहान भाऊ प्रवीण ढोबाळे यांचा तिवसा शहरात वचक आहे. पण, आता त्यांच्यासोबत अविनाश ऊर्फ प्रवीण पांडे हा जुळल्या गेला आहे. पाटील याच्या हत्येत तोही अटक झाल्याने जेलमधून सुटल्यावर ढोबाळे व पांडे यांची संयुक्त गँग होणार, त्यामुळे ढोबाळे गँगला पुन्हा बळ मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
बॉक्स ३
या घटनेतील आरोपी अविनाश ऊर्फ प्रवीण पांडे हा प्रसिद्ध सर्पमित्र असून, तो यादव देशमुख महाविद्यालयातील छात्रसंघ सचिव सुद्धा राहिला आहे. जुने वैमनस्य व अमोल पाटील आपल्याला केव्हाही जिवानिशी मारू शकतो, ही भीती अविनाश पांडे याच्या मनात होती. त्यातूनच त्याने पाटीलला संपविले.
कोट
आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे या पाच दिवसात आरोपींकडून हत्यार जप्त करून व इतर माहिती जाणून घेऊ. या प्रकरणात खोलात जाऊन पोलीस तपास करणार आहे.
- रिता उईके,
पोलीस निरीक्षक तिवसा