अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १६ ते २२ मे यादरम्यान सात दिवसांसाठी संचारबंदीचे नवे आदेश जारी केले आहे. या आदेशात ऑनलाईन परीक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी- २०२० ऑनलाईन परीक्षांचे २० मे पासून नियोजन चालविले असून, वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षांशी निगडित अधिकारी, कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळात सेवा बजावण्यासाठी विद्यापीठाला नव्याने आदेश पारित करण्यात येणार आहे. एकंदरीत १९८ परीक्षा घेण्यात येत असून, महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवारपासून अभियांत्रिकीच्या सत्र १ व ३ च्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झालेला आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.