शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नव्या प्रारूपात १७१ आरक्षण, ५२६ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:28 PM

येत्या २०४१ पर्यंत महानगराचा विकास करण्यासाठी नवे प्रारूप जाहीर करण्यात आले. यामध्ये १७१ आरक्षणात ३४१.८६ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ आरक्षण ही गार्डन, पार्क, अमूझमेंट पार्कसाठी आहे. ही ८७.३६ हेक्टरमध्ये विकसित करण्यात येतील.

ठळक मुद्दे२० वर्षांनंतर कसे असेल शहर? : गार्डन, पार्कसाठी सर्वाधिक ३१ आरक्षण, ८६.३६ हेक्टर विकसित करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या २०४१ पर्यंत महानगराचा विकास करण्यासाठी नवे प्रारूप जाहीर करण्यात आले. यामध्ये १७१ आरक्षणात ३४१.८६ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ आरक्षण ही गार्डन, पार्क, अमूझमेंट पार्कसाठी आहे. ही ८७.३६ हेक्टरमध्ये विकसित करण्यात येतील. प्ले ग्राऊंड, स्पोर्ट कॉम्पेक्स व जॉगींग ट्रॅकसाठी २३ आरक्षणात ५१.४७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे प्रारूप नागरिकांच्या सूचना व हरकतीसाठी २८ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २४ अन्वये नियुक्त नगर रचना अधिकारी विजया जाधव यांनी शहराचा आगामी २० वर्षापर्यंतचा म्हणजेच २०४१ पर्यंतची लोकसंख्यावाढ विचारात घेऊन सुधारित प्रारूप तयार केले. हे प्रारूप २८ नोव्हेंबरला नागरिकांच्या अवलोकनासाठी, हरकती व सूचनेसाठी महापालिका आयुक्त, नगर रचना विभाग उपसंचालक कार्यालय व महापालिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे. या सुधारित प्रारूपानुसार १२ हजार १६५ हेक्टरची चार सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पहिल्या सेक्टरमध्ये नवसारी, शेगाव, रहाटगाव, गंभीरपूर, तारखेडा व पेठ अमरावतीमध्ये २,८७६.४८ हेक्टर, दुसऱ्या सेक्टरमध्ये पेठ अमरावती, राजापेठ, तारखेडा, कॅम्प, वडाळी, म्हसला, रहाटगाव मध्ये ३,०६८.६५ हेक्टर, तिसºया सेक्टरमध्ये पेठ अमरावती, महाजानपूर, राजापेठ, सातुर्णा, निंभोरा, अकोली, वडाळी, जेवड व बेनोडामध्ये ३,३३७.५९ हेक्टर व चवथ्या सेक्टरमध्ये बडनेरा, वरूडा, अकोली व निंभोरामध्ये २,०८२.६१ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.या विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी ५२६.५८ कोटींचा खर्च येणार आहे. यामध्ये भूसंपादनाचा १८७.८६ कोटी, विकास बांधकाम ४७३.०२३ कोटी, प्रस्तावित विकास योजना रस्ते ३२८.५८ कोटींचा समावेश आहे. शासन निर्देसानुसार वार्त्रिक उत्पन्नाच्या २० १क्के तरतूद करणे ाावश्यक आहे महापालिकेचे २०१६-१७ चे उत्पन्ना २०८.३१ कोटी असल्याने याच्या २० टक्के म्हणजेच ४१.६२ कोटी अशी तरतूत विचारात घेता १० वर्षांत ४१६.६२ कोटी व शासनाकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी येणारे अनुदान विचारात घेऊन हे प्रारूप तयार करण्यात आलेले आहे.प्रस्तावित जमीन वापराचा तपशीलप्रस्तावित प्रारूपामध्ये रहिवासी वापराकरिता ६५५८ हेक्टर, भविष्यकालीन २७६.५६ हेक्टर, व्यावसायिक १९२.१०, औद्योगिक वापरासाठी २९८.२२, सार्वजनिक वापरासाठी ९८९.९०, वाहतूक व्यवस्था ६११.१७, बगिच्या, खेळाचे मैदान २७.५३, असे एकूण विकसित करावयाचे क्षेत्र ९०८३.२८ हेक्टर, कृषिविषयक १५६८.१९, वॉटर बॉडीज २१९.३३, फॉरेस्ट विषयक १२९४.५२ हेक्टर असे एकूण १२१६५.३४ हेक्टर राहणार आहे.असे आहेत प्रस्तावित आरक्षणनव्या प्रारूपात १७१ आरक्षण व ३४१.८६ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. यामध्ये बगिचे, पार्कसाठी ३१ आरक्षण ८७.३६ हेक्टर क्षेत्र, खेळाचे मैदान, क्रीडा संकुल, जॉगींग ट्रॅक २३ आरक्षण ५१.४७, टँकचे सौदर्यीकरण १ आरक्षण ९.९७, प्रायमरी शाळा १ आरक्षण ०.४८, भाजी मार्केट ११ आरक्षण १०.४१, मटन मार्केट १ आरक्षण ०.३७, लायब्ररी २ आरक्षण ०.१, व्यावसायिक संकुल ५ आरक्षण २.८५, क्रेमेशन ग्राऊंड ११ आरक्षण १३.०४, पार्किंग १३ आरक्षण ४.८, पब्लिक हाऊसिंग ९ आरक्षण १६.२५, पब्लिक अ‍ॅम्युनीटी ३३ आरक्षण ३३.५, कल्चर सेंटर ४ आरक्षण ११.४१, स्लेटर हॉऊस २ आरक्षण २.३४, ट्रक टर्मिनल २ आरक्षण १९.९३, सीटी बसस्टॅड ४ आरक्षण १२.५९, फायर ब्रिग्रेड स्टेशन ५ आरक्षन ६.०८, एएमसी बिल्डींग २ आरक्षण ७.४८,सॉलीड वेस्ट फॅसिलिटी ३ आरक्षण ३५.३४ दसरा मैदान १ आरक्षण ५.६ व वॉटर वर्कसाठी १ आरक्षण व ०.४ हेक्टर क्षेत्र राहणार आहे.मंजूर, प्रस्तावित विकास योजनांची तुलनात्मक स्थितीसद्यस्थितीत ५५१ आरक्षणात ६७४.२४ हेक्टर क्षेत्र आहे. प्रस्तावितमध्ये १९३ आरक्षण व ४०९.२० हेक्टर क्षेत्र आहे.सध्या इतर विभागासाठी ९७ आरक्षणात २१७.०६ हेक्टर क्षेत्र आहे,तर प्रस्तावितमध्ये २२ आरक्षणात ६७.३४ हेक्टर क्षेत्र आहे.सध्या महानगराशी संबंधित ४५४ आरक्षणात ४५७.१८ हेक्टर क्षेत्र, तर प्रस्तावितमध्ये १७१ आरक्षण व ३४१.८५ हेक्टर क्षेत्र आहे.सध्या कलम ३७,१२७ व ४९ अन्वये फेरबदलामुळे ५१७.५२ हेक्टर क्षेत्र आहे, तर प्रस्तावितमध्ये क्षेत्र निरंक आहे.सध्या रहिवासी वापराखाली ५९१०.५८ हेक्टर क्षेत्र, तर प्रस्तावितमध्ये ६५५८.९२ हेक्टर व रहिवासी झोनसाठी १८२.५० हेक्टर क्षेत्र राहणार आहे.