सॉफ्टवेअर कार्यान्वित : कर आकारणीत दिल्ली पॅटर्नची अंमलबजावणीअमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज अधिक सुलभ, गतिमान व अत्याधुनिक व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या नव्या संगणकीय प्रणालीने कामकाज सुरू झाले आहे. मात्र ही प्रणाली हाताळण्यास अनंत अडचणी येत असल्याने नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.केंद्र सरकारच्या आदेशानुसार ४.० ही नवी संगणकीय प्रणाली येथील आरटीओ कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. नवी प्रणाली सुरु करण्यापूर्वी आरटीओतील वाहनविषयक नियमित कामे जानेवारीत आठ दिवस बंद ठेवले होते. २१ जानेवारीपासून आरटीओ कार्यालयात ४.० नव्या संगणकीय प्रणालीद्वारे कामकाज प्रारंभ झाले. मात्र या प्रणालीत अनंत तृट्या असल्याने नागरिकांची कामे वेळीच पूर्ण होत नसल्याचे वास्तव आहे. कर्मचाऱ्यांना ही प्रणाली हाताळताना बहुतांश अडचणी येत आहेत. मात्र, वाहनविषयक बाबींचे कामे करताना अडचणी आल्यास औरंगाबाद, नांदेड येथील आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून त्या सोडिवण्याचा प्रयत्न होत आहे. आरटीओ कार्यालयात तांत्रिक अडचणी आाल्यास कर्मचारी नॅशनल इन्म्फॉमँटिक सेंटर (एनआयसी)च्या अभियंत्यासोबत संपर्क साधत असल्याचे चित्र आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या पारदर्शक कारभाराची नक्कल आता अमरावती आरटीओत करण्याचा प्रयत्न होत अून वाहन कराची रक्कम १० पट दर्शविली जात असल्याने वाहनचालकांची भंबेरी उडत आहे. त्यामुळे नवी प्रणाली गतिमान होण्याऐवजी ती त्रासदायक ठरत आहे. वाहनांच्या वयांचे निकष, कर आदींबाबत तांत्रिक अडचणीतून कसा मार्ग शोधावा या विवंचनेत कर्मचारी आले आहेत. आरटीओतील कर्मचाऱ्यांना एनआयसीमधून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड आहे. ही प्रणाली आरटीओत प्रारंभ होण्यास बराच कालावधी लागेल, असे संकेत आहे. परंतु ही प्रणाली सुलभ व अत्याधुनिक ठरण्यापेक्षा यात तृट्या अधिक जाणवत आहेत. प्रवासी आणि माल वाहतूकदारांना वाहनांसंबंधी आरटीओत कामकाजासाठी अलिकडे ही नवी प्रणाली नकोचीच भावना आहे. १० ते १२ दिवसांपासून ही नवी प्रणाली सुरळीत नसताना यात सुधारणा केलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही प्रणाली लागू करताना अनुभवी तंत्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांना नव्या प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रणालीत दोष असल्याने कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचणीतून मार्ग काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिनाभरापासून कामे खोळंबली आहेत. (प्रतिनिधी)खासगी व्यक्तींच्या हाती प्रशासकीय कामेनवीन प्रणाली ही केंद्र सरकारची आहे. या सॉफ्टवेअरची तांत्रिक बाबीची जबाबदारी एनआयसीवर सोपविली आहे. आॅनलाईन प्रक्रियेतून वाहनांचे शुल्क, फिजिकल बाबी तपासल्या जातात. मात्र आरटीओत प्रशासकीय प्रमुखांना या प्रणालीचा पासवर्ड देण्यात आलेला नाही. आरटीओत सगळी कामे आता खासगी व्यक्तींच्या हाती सोविण्यात आल्याने परिवहन आयुक्तांच्या आदेशाला तिलांजली देण्यात आली आहे.नव्या संगणकीय प्रणालीने कामकाज सुरू झाले आहे. काही अचडणी येत असल्या तरी एनआयसीच्या तंत्रज्ञाकडून त्या सोडविल्या जात आहेत. केंद्र सरकारचे ४.० हे सॉफ्टवेअर आहे.- श्रीपाद वाडेकर,आरटीओ, अमरावती
आरटीओत केंद्र सरकारची नवीन प्रणाली त्रासदायक
By admin | Published: February 11, 2017 12:14 AM