अमरावती : कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील ५५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सहकार प्राधिकरणाद्वारा नव्याने मतदार यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. २० सप्टेंबरपासून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात ‘ब’ वर्ग १४, ‘क’ वर्ग १९ व ‘ड’ वर्गातील २२ सहकारी संस्थांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ५५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया दीड वर्षापासून रखडलेली आहे. यामध्ये जिल्हा स्तरावरून नियंत्रण करण्यात येणाऱ्या १४ व तालुकास्तरावरील ४४ सहकारी संस्थांचा समावेश आहे. यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आलेले आहे.
ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केली होती व कोरोनामुळे रद्द झाली, त्या संस्थांची प्रथम टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याशिवाय अन्य चार टप्प्यात उर्वरित सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रियादेखील कालबद्ध कार्यक्रमात राबविण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
बॉक्स
‘ब’वर्गवारीतील सहकारी संस्था
हरिसाल आदिवासी विकास संस्था, दुनी आदिवासी विकास संस्थाा, चाकर्दा आदिवासी विकास संस्था, नांदुरी आदिवासी विकास संस्था, बिजुधावडी आदिवासी विकास संस्था, शिवपूर सेवा सहकारी संस्था, पूर्णा ॲग्रो बायोएनर्जी सहकारी संस्था, हरताळा सेवा सहकारी संस्था, जि.प. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, नवप्रभात कर्मचारी सहकारी पतसंस्था, वरूड संत्रा बागाईतदार सहकारी समिती, ग्रामीण डाकसेवक सहकारी संस्था, अभिनंदन अर्बन को-ऑफ बँक व जिल्हा सहकारी बोर्ड संस्थांचा समावेश आहे.