काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

By गणेश वासनिक | Published: June 22, 2024 08:48 PM2024-06-22T20:48:07+5:302024-06-22T20:48:58+5:30

अमरावती येथे काँग्रेस आदिवासी समितीच्यावतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार

Newly elected MPs felicitated by Congress Adivasi Samiti at Amravati | काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती : पक्ष संघटनेला आम्ही नेहमीच मातृ स्थानी मांडले आहे. काँग्रेसला आम्ही आई मानतो, त्यामुळे काँग्रेस वाढवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. दरम्यान जर कोणी आमच्या वाटेला जात असेल आणि दादागिरी करत असेल तर ती खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. काँग्रेस आदिवासी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी त्या बोलत होत्या.
काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेव किरसान, खासदार गोपाल पाडवी यांच्या सत्कार निमित्त अमरावती जिल्ह्यात आदिवासी काँग्रेस समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. मोघे काका यांनी काँग्रेससाठी नेहमीच मदत केली आहे. त्यांचे आणि आमचे वडील माजी आमदार दिवंगत भैय्यासाहेब ठाकूर यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आमच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा हातभार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. पक्ष संघटना ही नेहमीच आम्ही मातृस्थानी मांडली आहे, जर काँग्रेस पक्ष नसता तर आम्हाला एवढी ओळख आणि मानसन्मान मिळाला नसता त्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बळकटी देणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार यांनी अमरावती जिल्ह्यात एक कार्यालय अडवून ठेवले होते. वास्तविक जिल्ह्यातून जनतेमधून निवडून गेलेले नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सदर ठिकाणी हक्क असताना केवळ अडवणूक करायची म्हणून संबंधित खासदाराने अडवणूक केली होती. मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्क मिळवला आहे. अशा पद्धतीने जर कोणी दादागिरी करत असेल तर ते आम्ही जराही खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी ॲड. ठाकूर यांनी दिला.

Web Title: Newly elected MPs felicitated by Congress Adivasi Samiti at Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.