शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

काँग्रेसला आम्ही आई मानतो, दादागिरी चालू देणार नाही : ॲड. यशोमती ठाकूर

By गणेश वासनिक | Published: June 22, 2024 8:48 PM

अमरावती येथे काँग्रेस आदिवासी समितीच्यावतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार

अमरावती : पक्ष संघटनेला आम्ही नेहमीच मातृ स्थानी मांडले आहे. काँग्रेसला आम्ही आई मानतो, त्यामुळे काँग्रेस वाढवण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. दरम्यान जर कोणी आमच्या वाटेला जात असेल आणि दादागिरी करत असेल तर ती खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. काँग्रेस आदिवासी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी त्या बोलत होत्या.काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेव किरसान, खासदार गोपाल पाडवी यांच्या सत्कार निमित्त अमरावती जिल्ह्यात आदिवासी काँग्रेस समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. मोघे काका यांनी काँग्रेससाठी नेहमीच मदत केली आहे. त्यांचे आणि आमचे वडील माजी आमदार दिवंगत भैय्यासाहेब ठाकूर यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. आमच्या जडणघडणीतही त्यांचा मोठा हातभार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. पक्ष संघटना ही नेहमीच आम्ही मातृस्थानी मांडली आहे, जर काँग्रेस पक्ष नसता तर आम्हाला एवढी ओळख आणि मानसन्मान मिळाला नसता त्यामुळे काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे आणि काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बळकटी देणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार यांनी अमरावती जिल्ह्यात एक कार्यालय अडवून ठेवले होते. वास्तविक जिल्ह्यातून जनतेमधून निवडून गेलेले नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सदर ठिकाणी हक्क असताना केवळ अडवणूक करायची म्हणून संबंधित खासदाराने अडवणूक केली होती. मात्र त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्क मिळवला आहे. अशा पद्धतीने जर कोणी दादागिरी करत असेल तर ते आम्ही जराही खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी ॲड. ठाकूर यांनी दिला.

टॅग्स :AmravatiअमरावतीYashomati Thakurयशोमती ठाकूरcongressकाँग्रेस