शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

भारत बंदच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:30 AM

फोटो पी ०८ नांदगाव नांदगावात कडकडीत बंद नांदगाव खंडेश्वर : अखिल भारतीय किसान संघर्ष व समन्वय समितीने मंगळवारी अमरावती-यवतमाळ ...

फोटो पी ०८ नांदगाव

नांदगावात कडकडीत बंद

नांदगाव खंडेश्वर : अखिल भारतीय किसान संघर्ष व समन्वय समितीने मंगळवारी अमरावती-यवतमाळ मार्गावर चक्काजाम केला. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, शिवसेना, माकप, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना व विविध संघटनाची मंडळी सहभागी झाली होती. संपूर्ण बाजारपेठ तसेच बाजार समिती कडकडीत बंद होती. यात माजी आमदार वीरेंद्र जगताप, दीपक सवाई, अक्षय पारसकर, सचिन रिठे, अमोल धवसे, देविदास सुने, राजेंद्र चोरे, विनोद जगताप, प्रदीप ब्राह्मणवाडे, गजानन भडके, गजानन मारोटकर सहभागी झाले.

----------------

फोेटो पी ०८ चांदूरबाजार

चांदुर बाजार तालुका कडकडीत बंद

चांदूर बाजार : तालुक्यात काँग्रेस व प्रहारतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. त्यानुसार शहरातील सर्व प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेवली होती. प्रहार कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौका्मधून रॅली काढून बंदचे आवाहन केले. बंदमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर देशमुख, भाई देशमुख, विकास सोनार, तुषार देशमुख, प्रहारतर्फे नगराध्यक्ष नितीन कोरडे, नगरसेवक सरदार खाँ, सचिन खुळे, पवन वाट, ऋषीकेश खोडपे, शिशिर मकोडे, अकबर अली, अजय श्रुंगारे, अजय मलिये सहभागी झाले.

----------------

फोटो पी ०८ अंजनसिंगी

अंजनासिंगीत कडकडीत बंद

अंजनसिंगी : गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकरी बंदमध्ये सहभाग नोंदविला. बस स्थानकावर एका छोटेखानी सभा घेण्यात आली. श्रीकृष्ण गायकवाड यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. शाहीर धम्मा खडसे, भाकपचे अशोक काळे, विश्वास कांबळे, कैलास ठाकरे, नंदू पडघान, किरण खंडारे, काँग्रेसचे अवधूत दिवे, अशोक वानखडे, सतीश थोटे, प्रमोद वैद्य तसेच शिवसेनेचे राम शिर्के, श्याम शिर्के, नवरंग अग्रवाल सहभागी झाली.

-------------------------

फोेटो पी ०८ नेरपिंगळाई

नेरपिंगळाई येथे भारत बंद

नेरपिंगळाई : महाआघाडीमधील तीनही घटक पक्षांसह भाकप, किसान सभा, प्रहार, शेतकरी-शेतमजूर संस्था, समविचारी संघटनांच्यावतीने ८ डिसेंबर रोजी नेरपिंगळाई बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नेरपिंगळाई येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली,

---------------------------

फोेटो पी ०८ भुयार

शेंदूरजनाघाट येथे आमदारांचा चक्काजाम

वरूड : तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आमदारांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. वरूड व शेंदूरजनाघाट या दोन्ही पालिका क्षेत्रांमध्ये बंदला व्यापक प्रतिसाद मिळाला. वरूड येथे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात बंद यशस्वी करण्यात आला. भारत बंदमध्ये महाआघाडीतील तिन्ही पक्षांसह अन्य समविचारी संघटक सहभागी झाले.

------------

फोटो पी ०८ चिखलदरा

चिखलदऱ्यात सर्वपक्षीय बंदला प्रतिसाद

चिखलदरा : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे तात्काळ रद्द करण्याचे निवेदन तहसीलदार माया माने यांना देण्यात आले, तर बंददेखील यशस्वी करण्यात आला. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, धर्मराज खडके, मिश्रीलाल झारखंडे, शिवसेनेचे टिल्लू तिवारी, प्रहारचे विनोद जगताप, जगत शनवारे, जहीर शेख, यशवंत काळे, पीयूष मालवीय, संतोष गायन, बाबू हेकडे, विन्सेंट चंदामी, शेख अब्दुल, घनश्याम सगणे आदी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार व इतर संघटनांचे कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले.

-------------

फोटो पी ०८ देवगाव

देवगावात चक्काजाम, धामणगाव बंद

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील देवगाव येथे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. येथे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. तत्पूर्वी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चेतन परडखे, प्रशांत बायस्कर, मोरेश्वर शेंडे, प्रमोद बुराडे, स्वप्नील काटकपुरे, दिनेश वाघामारे, किशोर बावनकुळे, विवेक मोरे यांना तळेगाव दशासर पोलिसांनी ताब्यात घेतले. धामणगाव शहरातील मुख्य बाजारपेठ, बाजार समिती, जिल्हा बँकेच्या शाखा, काही शाळा-महाविद्यालये पूर्णत: बंद होती.

----------------

फोटो पी ०८ मोर्शी बंद

मोर्शीत रास्ता रोको, बंद व्यापक

मोर्शी : स्थानिक जयस्तंभ चौक येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, प्रकाश अढाऊ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश काळे, बाजार समिती संचालक प्रकाश विघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हितेश साबळे, रूपेश वाळके, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, प्रदीप कुऱ्हाडे, मोरेश्वर गुडधे, बंडू साऊत, शिवसेनेचे सुरेशचंद्र विटाळकर, अतुल उमाळे, सुहास ठाकरे, दिनेश मिश्रा, दीपक खोडस्कर, विनोद सोनटक्के, प्रशांत उमाळे, नीलेश लायदे, भूषण कोकाटे, योगेश गणेश्वर, नितीन पन्नासे आदी सहभागी झाले.

------------

फोटो पी ०८ दर्यापूर

दर्यापूर बंद कडकडीत

दर्यापूर : राजधानी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुकारलेल्या भारत बंदला दर्यापुरात उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारापेठ, बाजार समिती बंद होती. महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, एमआयएम आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला तसेच पेट्रोल पंप चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

---------