अमरावती : बडनेरानजीक वरूडा मार्गावरील स्मशानभूमीच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. पथदिवे बंद असून, अस्वच्छता पसरली आहे. या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी
नागरिकांची आहे.
----------------------------------
वडाळी भागात स्वच्छतेचा अभाव
अमरावती : स्थानिक वडाळी भागात पंचशीलनगर, पारधी बेडा आदी भागात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. दररोज साफसफाई होेणे गरजेचे असताना ते होत नाही, अशी ओरड या भागातील नागरिकांची आहे. लोकप्रतिनिंधीनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
-------------------------
विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ४० टक्के पदे रिक्त आहे. परीक्षा विभागात रिक्त पदांमुळे नियमित कामकाजावर परिणाम जाणवत आहे. दैनंदिन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर परीक्षा विभागाचा डोलारा सुरू आहे. शासनाकडे रिक्त पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे.
--------------------------
महानगरात उघड्यावर मांसविक्री
अमरावती : महानगरात उघड्यावर मांसविक्री ही नित्याचीच बाब झाली आहे. एसटीचे विभागीय कार्यालय समाेर, सातुर्णा, गोपालनगर, बडनेरा जुनीवस्ती, नवीन बायपासलगत, शेगाव नाका रोड, रहाटगाव, नवसारी आदी भागात होत असलेली उघड्यावर मांसविक्री थांबवावी, अशी मागणी आहे.
--------------------------
कॉटन मार्केट चौकात रस्ते निर्मिती संथगतीने
अमरावती : स्थानिक कॉटन मार्केट चौकत गत काही महिन्यांपासून सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य सुरू असले तरी ते अतिशय संथगतीने आहे. त्यामुळे या चौकात दररोज वाहतूक काेंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्ते निर्मिती वेगाने करावी, अशी मागणी आहे