अमरावती : बडनेरा ते माहुली चोर यादरम्यान यवतमाळ मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने ते अपघातास कारणीभूत ठरणारे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांची आहे.
---------------------
शहरात विद्युत खांब उभारणीला वेग
अमरावती : महापालिका क्षेत्रात विविध भागांत विद्युत खांब उभारणीला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत असोरिया ले-आउट, कल्पनानगर आदी भागात आ. सुलभा खोडके यांच्या हस्ते या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या वेळी नगरसेवक प्रशांत महल्ले, मंजुश्री महल्ले, नीलिमा काळे आदी उपस्थित होते.
-------------------------
ईतवारा बाजारात वाहतूककोंडी
अमरावती : येथील ईतवारा बाजारात उड्डाणपूल निर्मितीचे कार्य सुरू आहे. अगोदरच रस्ता अरुंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आता कामांमुळे त्यात भर पडली असून, चित्रा ते चांदनी चौक यादरम्यान वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे.
-------------------------
बडनेरा जुनी वस्तीत रस्ते निर्मिती सुरू
अमरावती : बडनेरा जुनी वस्तीत सिमेंट रस्ते चौपदरीकरण वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे काही भागात रस्ते खोदकाम झाले असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत नाही. रस्ता पार करताना बराच वेळ लागत आहे. रस्ते चौपदीकरणाची कामे वेगाने करावीत, अशी मागणी आहे.
----------------------
पॅसेजर गाड्यांची प्रतीक्षा
अमरावती : रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, गरीब, सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे गाव, खेड्यात ये-जा करणे महागले आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने एसटीने प्रवास करावा लागत आहे. तो महागडा असल्याची ओरड आहे.