अमरावती : पोलीस आयुक्त कार्यालय ते समाजकल्याण कार्यालयादरम्यान रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच आढावा घेतला असताना, तत्पूर्वी रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना दिलासा मानला जात आहे.
----------------------------
स्मशानभूमींच्या विकासाकडे दुर्लक्ष
अमरावती : महानगरातील स्मशानभूमीच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश स्मशानभूमींना संरक्षण कुंपण नाही. शेड गायब झाले असून, अंत्यविधीसाठी गैरसोय असल्याची तक्रार नागरिकांचा आहेत. प्रशासनाने स्मशानभूमींच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
-----------------------------
रेल्वे स्थानक परिसरात कचरा डेपो
अमरावती : रेल्वे स्थानकाच्या काही भागात बाहेरील नागरिक कचरा आणून टाकतात. इर्विन मार्गावर ही बाब नियमितपणे दिसून पडते. संरक्षण भिंतीच्या आत कचरा डेपो तयार झाल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या दूर करावी, अशी मागणी आहे.
-----------------------
फ्रेजरपुरा ते यशोदानगर मार्गाची दुरुस्ती
अमरावती : स्थानिक फ्रेजरपुरा ते यशोदानगर मार्गाची दुरुस्ती वेगाने सुरू झाली आहे. जुने बायपासवर जागोजागी खड्डे पडले होते. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. या मार्गालगत नागरी वस्त्यांचे प्रमाण अधिक असताना रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने दिलासा मानला जात आहे.
------------------------------
सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अमरावती: शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष चालविल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने सार्वजनिक शौचालयाची समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बडनेराच्या आदिवासीनगरात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे.