अमवरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात आयएएस पूर्व प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे. हल्ली आयएएस पूर्व प्रशिक्षण जुने इमारतीत सुरू आहे. मात्र, आता नवीन इमारत निर्माण कार्य वेगाने होत असल्याने लवकरच नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहे.
----------------------
शेगाव नाका ते रहाटगाव मार्ग रस्ता उखडला
अमरावती : स्थानिक शेगाव नाका ते रहाटगाव मार्ग यादरम्यान जागोजागी रस्ता उखडला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना रस्ता शोधावा लागत आहे. मार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
------------------------
गरिबांचा फ्रीज बाजारपेठेत दाखल (फोटो आहे)
अमरावती : गत दोन दिवसांपासून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तापमान वाढत असून, थंड पाणी वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अशातच गरिबांचा फ्रीज असलेले मातीचे माठ विक्रीस दाखल झाले आहेत. १५० ते २०० रुपये मातीच्या माठाला दर आहेत.
--------------------------------
विलासनगरात नालीतील कचरा समस्या कायम
अमरावती : येथील विलासनगरात नालीतील कचरा बाहेर काढल्यानंतर तो बाजूलाच ठेवण्यात येतो. नालीलगतचा कचरा त्वरित उचलला जात नाही. त्यामुळे नालीतील कचरा साचृून राहतो. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहचत आहे. कचरा लगेच उचलावा, अशी मागणी आहे.
--------------------------
विद्यापीठात टँकरद्धारे झाडांना पाणी (फोटो आहे)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विविध झाडांना टँकरद्धारे पाणी देण्यात येत आहे. जेमतेम उन्हाळा सुरू होताच विद्यापीठातील हिरवळ सुकू नये, यासाठी उद्यान अधीक्षक अनिल घोम यांनी फुलझाडे, वृक्षांना जगविण्यासाठी नियोजन चालविले आहे.