अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळ्याची चाहुल लागताच वृक्ष संगोपन, देखभालीस वेग आला आहे. उद्यान अधीक्षक अनिल घोम व त्यांची चमू वृक्षांची निगा, काळजी घेत आहेत. टँकरने पाणी दिले जात आहे.
----------------------
बडनेरा मार्गावर रस्ते दुभाजकावर हिरवळ सुकली
अमरावती : बडनेरा मार्गावरील रस्ता दुभाजकावर हिरवळ सुकली आहे. लाखो रुपये खर्च करून शोभीवंत फुलझाडे लावली. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षाने ही हिरवळ नामशेष झाली आहे. अनेक दिवसांपासून या हिरवळीला पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकावरील हिरवळ लयास येत आहे.
------------------
बडनेरा जुनीवस्तीत रस्त्याची चाळण
अमरावती : बडनेरा जुनीवस्तीत कमलीवाले दर्गाहसमोरील मार्ग जागोजागी उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
----------------------
विद्यापीठ मार्गावर खुल्या जागेवर अतिक्रमण
अमरावती : स्थानिक बियाणी चौक ते विद्यापीठ मार्गावरील खुल्या जागवेर अतिक्रमणाचा सपाटा सुरू झाला आहे. यात कृषी महाविद्यालयांच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत आहे. खुल्या जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
---------------------
कारागृहाचे साहित्य विक्री केंद्राच्या शुभारंभाची प्रतीक्षा
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाचे साहित्य विक्री केंद्राची इमारत बांधून तयार झाली आहे. साहित्य विक्रीतून कैद्यांच्या रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. मात्र, हे केंद्र कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.