अमरावती : बडनेरा पाचबंगला परिसरातील मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. जड वाहनांच्या वर्दळीने हा मार्ग नादुरुस्त झाला आहे. या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गालगत नागरी वस्ती असून, अपघाताची शक्यता बळावली आहे.
----------------
चिचफैल मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे
अमरावती : येथील रेल्वे स्थानक चौक ते चिचफैल मार्गावरील रस्ता जागोजागी उखडला आहे. या मार्गावर सतत वर्दळ राहत असताना खड्ड्यांची दुरूस्ती करण्यात येत नाही. नगरसेवकांचे या मार्गाकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
---------------------------
कारागृह वसाहत परिसरात कचऱ्याची समस्या
अमरावती : चांदूर रेल्वे मार्गालगतच्या कारागृह वसाहतीत कचरा समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमधून रहिवासी कचरा याच भागात आणून टाकत असल्यामुळे कचरा समस्या वाढतच आहे. रस्त्यालगत जागोजागी कचरा टाकल्या जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे.
-----------------------
बडनेरा आठवडी बाजारात अतिक्रमण कायम
अमरावती : बडनेरा नवीवस्तीच्या आठवडी बाजारात अतिक्रमण अद्याप काढण्यात आले नाही. या अतिक्रमणास नगरसेवकांचे अभय असल्याचे बोलले जात आहे. मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण होत असताना महापालिका प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत आहे.
--------------------------
उघड्यावरील मांसविक्री कधी रोखणार?
अमरावती : शहरातील उघड्यावरील मांस विक्री ही समस्या कधी संपणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यालगत होणारी मांसविक्री रोखण्यासाठी प्रशासन कधी पाऊल उचलणार, अशी मागणी करण्यात येत आहे.