अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दीक्षांत समारंभासह अर्थसंकल्पाची लगबग सुरु झाली आहे. विविध विभागांमधून यासाठी माहिती गोळा करण्यात येत आहे. वित्त व लेखा विभागाने त्या अनुषंगाने तयारी सुरु केली असून, मार्चमध्ये सिनेट सभेचे आयोजन होणार आहे.
----------------------
ईतवारा बाजारात घाणीचे साम्राज्य
अमरावती : येथील ईतवारा बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भाजी विक्रेते, हातगाडी व्यावसायिक शिल्लक राहिलेला भाजीपाला तेथेच टाकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. वराहांचा सुळसुळाट ही देखील मोठी समस्या आहे.
--------------------
नागपुरी गेट चौकात वाहनांची कोंडी
अमरावती : नागपुरी गेट चौकात सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वलगाव मार्गावर रस्त्यावरच वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे.
-------------------------
बायपासलगत सागवान वृक्ष बेवारस
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधिनस्थ बायपासलगत शेकडो सागवान वृक्ष बेवारस स्थितीत आहेत. या वृक्षांची काळजी घेण्यात येत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. हळहळू यातील सागवान वृक्षांची कत्तल करून त्यांची चोरी केली जात आहे. त्यामुळे काहीच दिवसात येथील सागवान वृक्ष नामशेष होतील, अशी भीती आहे.
-----------------------
विद्यापीठात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारले जाणार आहे. ‘युजीसी’कडून प्राप्त निधीतून वसतिगृह उभारण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. पीजी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी हे वसतिगृह सोयीचे ठरणार आहे.