५३ ग्रा.पं.ची निवडणूक : एका उमेदवाराला येणार २५ हजार खर्चधामणगाव रेल्वे : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता दुसऱ्या दिवशी ७०० नामांकनाची उचल करण्यात आली आहे़ १६ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे बुधवारी नामांकन घेण्यासाठी एकच गर्दी संभाव्य उमेदवारांनी केली होती़तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४० हजार ९८५ महिला व ४४ हजार ४८ पुरूष मतदार आगामी काळात निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावणार आहे़ अंजनसिंगी, जुना धामणगाव, तरोडा, विरूळ रोंघे, जळगाव आर्वी, गव्हाफरकाडे, अशोकनगर, ढाकुलगाव, गव्हानिपाणी, पिंपळखुटा, मंगरूळ दस्तगीर, पेठ रघुनाथपूर, बोरगाव निस्ताने, झाडा, वरूड बगाजी, कावली, वसाड, वाठोडा बु, जळगाव मंगरूळ, चिंचपूर, शिदोडी, दिघी महल्ले, देवगाव, बोरवघड, निंभोरा बोडका, रायपूर, बोरगाव धांदे, भातकुली, सोनेगाव खर्डा, जळकापटाचे, चिंचोली, निंबोली, तळणी, कासारखेड, झाडगाव, विटाळा, हिंगणगाव, वाघोली, तळेगाव दशासर, वाढोणा, आसेगाव, शेंदूरजना खुर्द, तिवरा, काशीखेड, घुसळी, सावळा, निंभोरा राज, हिरपूर, आजनगाव, कळाशी, वडगाव राजदी, वकनाथ, दाभाडा या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण राजकीय वातावरण तापले आहेत़तालुक्यातील या ग्रामपंचायतीमधून ४५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत़ त्यासाठी १७४ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे़ अनुसूचित जातीकरिता ३४, अनुसूचित जमातीकरिता १२, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ६३ तर सर्वसाधारणकरिता ११० जागा राखीव आहे़ विशेषत: महिलांकरिता अनुसूचित जातीसाठी ४९, अनुसूचित जमाती २६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ६१ तर सर्वसाधारण महिलांसाठी १२१ जागा आरक्षित आहे़ नामांकन स्वीकारण्याकरिता नऊ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक अधिकाऱ्याकडे किमान पाच ते सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज देण्यात आले आहे़ निवडणूक विभागातील विभागाचे नायब तहसीलदार संजय रापत्तीवार व वरिष्ठ लिपीक संजय खेडकर, रवी पवार, सुनील कन्नमवार हे कामकाज पाहत आहे़ निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.जात पडताळणी प्रमाणपत्राची जोडावी लागणार पोच पावती राखीव प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र समाज कल्याण विभागात टाकले असल्याची पोच पावती जोडावी लागणार आहे़ प्रत्येक उमेदवाराला घोषणापत्र सादर करावी लागणार आहे़ निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच मालमत्ता व दायित्वाबाबतचे विहीत नमुन्यातील शपथपत्र किंवा घोषणापत्र तसेच उमेदवरांचा अपत्याबाबतचे शपथपत्र किंवा घोषणापत्र दाखल करणे बंधनकारक आहेत़ सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढतांना पाचशे रूपये अनामत रक्कम तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना १०० रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे़ निवडणुकीच्या ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करावा लागणार असून एका उमेदवाराला २५ हजारापर्यंत निवडणूक खर्च करता येणार असल्याचे तहसीलदार शब्मुख राजन यांनी सांगीतले़सरपंच आरक्षणाकडे लक्षगत पाच वर्षापूर्वी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुक ा २४ एप्रिल रोजी झाल्या होत्या तर सरपंच पदाची सोडत ८ एप्रिल रोजी झाली होती़ ग्रामविकासाचा महत्त्वाचा केंद्र बिंदू असणाऱ्या या सरपंच पद आरक्षणाची सोडत ४ एप्रिल रोजी होऊ शकणार आहे़ याकडे आता तालुक्यातील निवडणूक असलेल्या सर्वच ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले जात आहे़
दुसऱ्या दिवशी ७०० नामांकनाची उचल, १६ जणांचे अर्ज दाखल
By admin | Published: April 02, 2015 12:38 AM