पंकजा मुंडेंचे प्रतिपादन : मेळघाट बालसमृध्दी योजनेचा शुभारंभचिखलदरा : येत्या पाच वर्षात मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात आपणास यश आले तर तिच माझे वडिल गोपीनाथ मुंडे यांना खरी आदरांजली ठरेल, असे भावूक प्रतिपादन महिला बालविकास व ग्रामविकास राज्यमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. मेळघाट बालसमृध्दी योजनेच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर आ. प्रभुदास भिलावेकर, आ. प्रवीण पोटे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंग सोमवंशी, पंचायत समिती सभापती दयाराम काळे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जि.प.चे मुख्याधिकारी अनिल भंडारी, जि.प.सभापती अरूणा गोरले, वनमाला खडके, क्षमा चौकसे, श्याम गंगराळे, सदाशिव खडके आदी मान्यवर उपस्थित होते. मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने या भागासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कुपोषण नष्ट करण्यासाठी गर्भवती मातांना पोष्टिक आहार पुरविण्याची गरज यावेळी पंकजा मुंडेनी व्यक्त केली. मातेला ताकद दिली तर येणारी पिढी कुपोषित होणार नाही, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मेळघाट बालसमृध्दी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
कुपोषणमुक्त जन्मावी पुढची पिढी
By admin | Published: November 24, 2014 10:49 PM