लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन मोर, दोन काळवीट आणि २० सशांची शिकार करून पारधी बेड्यावर मांसविक्री होत असल्याची माहिती एनजीओंकडून भल्या पहाटे विभागीय वनाधिकारी (दक्षता पथक) यांना बुधवारी मिळाली. त्या आधारे शेकडो वनाधिकाऱ्यांचा ताफा शेंदोळा धस्कट, शिरजगाव मोझरी येथील पारधी बेड्यावर पोहोचला. तब्बल पाच तास मोहीम चालली. मात्र, ही माहिती खोटी ठरल्याने वनाधिकाºयांची कसरत वाया गेली.सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वडाळी, चांदूर रेल्वे, परतवाडा, मोर्शी परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आदींचा समावेश असलेला १० ते १२ वाहनांचा ताफा पारधी बेड्याच्या पहाटे ५ वाजता दिशेने निघाला. प्रारंभी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत शेंदोळा धस्कट व नंतर मोर्शी वनपरिक्षेत्रांतर्गत शिरजगाव मोझरी येथील पारधी बेड्यावर सर्च वॉरंटच्या आधारे काही घरांची कसून तपासणी करण्यात आली. परंतु, शेंदोळा येथे वन्यजीवांचे मांस अथवा वन्यजीव दिसून आले नाही. तितेर, बटेर पकडण्याचे जाळे तेवढे वनाधिकाºयांना आढळले.माहितीच्या आधारे कर्तव्य बजावणे हा सेवेचा भाग आहे, अन्यथा कोणीही गोपनीय माहिती देणार नाही. माहिती खोटी असली तरी घटनास्थळाहून शिकार साहित्य, दोन गावठी बॉम्ब ताब्यात घेतले. यापुढे एनजीओच्या टिप्सबाबत अलर्ट राहू.- गजेंद्र नरवणे,उपवनसंरक्षक, अमरावती.
एनजीओंच्या ‘टीप’ने वनाधिकाऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:24 AM
दोन मोर, दोन काळवीट आणि २० सशांची शिकार करून पारधी बेड्यावर मांसविक्री होत असल्याची माहिती एनजीओंकडून भल्या पहाटे विभागीय वनाधिकारी (दक्षता पथक) यांना बुधवारी मिळाली. त्या आधारे शेकडो वनाधिकाऱ्यांचा ताफा शेंदोळा धस्कट, शिरजगाव मोझरी येथील पारधी बेड्यावर पोहोचला.
ठळक मुद्देधाडसत्र फ्लॉप : पाच तासांचे श्रम व्यर्थ