शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

विजेचा शॉक देऊन निकिताची हत्या

By admin | Published: February 28, 2016 11:59 PM

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निकिता सवई मृत्यू प्रकरणाचे गूढ बाहेर आले आहे.

आरोपी रोहित वानखडेला अटक : आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलअमरावती : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निकिता सवई मृत्यू प्रकरणाचे गूढ बाहेर आले आहे. प्रेमसंबंधात झालेल्या वादामुळे निकिताला विजेचा शॉक देऊन तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. रविवारी निकिता हिची आई ज्योती अरुण सवई (४२, रा, लोणी टाकळी) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी रोहित वानखडेविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी मधुकर ढोले यांच्या घरात निकिता भाड्याने खोली घेऊन राहात होती. २२ फेब्रुवारी रोजी तिचा खोलीतच संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. निकिताच्या चुकीने विजेचा शॉक लागला की, हत्येच्या उद्देशाने तिला विजेचा शॉक लावण्यात आला, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. प्रकरणाचा तपासात संभ्रम निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन निकिताच्या खोलीची पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देऊन तपासकार्य लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी तपासातील विविध बाजू पडताळून पाहिल्या. निकिताच्या संपर्कात असणाऱ्यांची बयाणे नोंदविली. तिचे कॉल डिटेलवरून तिच्याशी धनिष्ट संबंध असणाऱ्यांची चौकशी केली. यामध्ये पोलिसांनी रोहित वानखडे या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेही निकिताशी संबंध असल्याचे व मृत्यूपूर्वी तो तिच्या घरी गेल्याची कबुली दिली. मात्र, अद्यापपर्यंत रोहितने गुन्ह्याची कबुली दिली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी निकिताची आई ज्योती अरुण सवई यांनी रोहितविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.निकिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.- एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक.