संदीप मानकर अमरावती- पाहिजे तसा दमदार पाऊस पश्चिम विदर्भात कोसळला नसल्याने ३१ जुलैपर्यंत एकही मोठा प्रकल्प शंभर टक्के भरलेला नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण भरण्याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ६८.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा १३९९.९१ दलघमी आहे.यामध्ये आजचा उपयुक्त पाणीसाठा ९६२.१७ दघमी असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. त्याची सरासरी टक्केवारी ६८.७३ टक्के होते. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा प्रकल्पात ७७.४३ टक्के पाणी शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ६०.३९ टक्के, अरुणावती सर्वात कमी ३५.३३ टक्के, बेंबळा सर्वाधिक ८६.७६ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८४.७६ टक्के, वान ४१.६१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ५८.१५ टक्के, पेनटाकळी ५८.३५ टक्के, खडकपूर्णा ७२.९९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पानिहाय पर्जन्यमानउर्ध्व वर्धा एकूण पर्जन्यमान ४६५.० मीमी झाले. पुस प्रकल्प २७२.० मीमी, अरुणावती २७०.० मीमी, बेंबळा ३४१.० मीमी, काटेपूर्णा ३७१.० मीमी, वान ५१३.० मीमी, नळगंगा २०५.० मीमी, पेनटाकळी ४१७.०मीमी, खडकपूर्णा २९६.० मीमी पावसाची नोंद झाली आहे.
२५ मध्यम प्रकल्पांत ६० टक्के पाणीसाठापश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६०.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४७७ लघु प्रकल्पांत सरासरी ४९.८२ टक्के पाणीसाठा आहे. मोठे, लघु व मध्यम असे एकूण ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ६०.२७ टक्के पाणीसाठा हा ३१ जुलै पर्यंतच्या आवाहलानुसार शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, वाशीम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे, हे विशेष!