लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील आठ प्रकल्प पावसाळा संपल्यानंतरही ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्याकरिता धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परतीच्या दमदार पावसामुळे नऊ प्रकल्पांचे १९ दरवाजे अद्यापही उघडेच आहेत.अमरावती जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून, एक गेट १० सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्प १०० टक्के भरला असून, १५ सेंटिमीटरने तीन गेट उघडले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पात ९५.०२ टक्के पाणीसाठा असून, पाच गेट ७५ सेंटिमीटरने उघडले आहेत.मध्यम प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ९९.६१ टक्के पाणीसाठा असून, दोन गेट पाच सेंटिमीटर उघडे आहेत. चंद्रभागा प्रकल्प १०० टक्के भरला असून एक गेट पाच सेंटिमीटरने, ९८.६४ टक्के भरलेला पूर्णा प्रकल्पाचे दोन गेट तीन सेंटिमीटरने, १०० टक्के भरलेल्या सपन प्रकल्पाचे दोन गेट २५ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. गेल्या एका महिन्यापासून सदर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मन प्रकल्पाचे एक गेट पाच सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विदर्भातील नऊ प्रकल्प अद्यापही ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:45 PM
पश्चिम विदर्भातील आठ प्रकल्प पावसाळा संपल्यानंतरही ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतून होणारा पाण्याचा विसर्ग पाहण्याकरिता धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
ठळक मुद्देनऊ प्रकल्पांचे १९ दरवाजे उघडेच परतीच्या पावसाचा परिणाम