लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/गुरुकुंज (मोझरी) : मांगल्याचा दिवाळी सण सर्वत्र आतषबाजीत सुरू असताना, रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेल्या, उपेक्षित वयोवृद्धांना वयाच्या नव्वदीत अभ्यंगस्नान आणि सुगंधी उटण्याने स्नान घातल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम शुक्रवारी पार पडला.हिंदू संस्कृतीत पवित्र, आनंद, उल्हास आणि प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. या सणाला पोटच्या गोळ्याने नाकारल्याने वृद्धाश्रमात दिवस कंठणाऱ्या वृद्धांसमवेत लढा संघटनेने भाऊबीजचा कार्यक्रम पार पडला. वृद्ध महिला व पुरुषांचे उटणे, चंदन, सुवासिक तेलाने अभ्यंग स्नान घालण्यात आले. त्यांचे वाढलेली नखे कापून, दाढी करून गोडधोड तसेच नवीन कपडे देण्यात आले.लढा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागील १३ वर्षांपासूनची परंपरा कायम राखत या निराधार वृद्ध व्यक्तींना आपलेसे करीत पायाची नखे काढण्यापासून सुगंधी उटणे लावून त्यांना वयाच्या नव्वदीत अभ्यंग स्नान घातले. यावेळी त्यांच्या चेहºयावर आनंदाश्रू ओसंडून वाहताना दिसून आले. यावेळी त्यांना परिधान करण्यासाठी नवीन कपडे, लुगडी, भगवी टोपी दिली. कुटुंबासोबत कधीकाळी साजरी केलेली दिवाळी आज त्यांना आठवली. रक्ताने पारखे, पण मनाने एकरूप झालेल्या या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सण साजरा केला. त्यांना यावेळी जेवणात खास बासुंदीचा मेन्यू ठेवण्यात आला होता, हे विशेष.‘लोकमत’ची साथ‘लोकमत’ने काही दिवसांआधी सामाजिक जाणिवेतून 'यंदा तरी दिवाळीला घरी न्याल का?' अशी आर्त साद त्यांच्या सग्यासोयऱ्यांना घातली होती. पण, दुर्दैवाने एकाही वृद्धाच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकडे पाहिले नाही, अशी माहिती वृद्धाश्रमाचे सुभाष सोनारे यांनी दिली. पण, ‘लोकमत’च्या बातमीने अनेक सामाजिक संघटना सरसावल्या.वृद्धाश्रमात दिवाळीमागील पाच दिवसांपासून ‘लोकमत’च्या सहकार्या$तून श्रीगुरुदेव वृद्धाश्रमात सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दररोज दिवाळी सुरू आहे. अनेकांना यासाठी तारखा मिळविल्या असल्याचे वृद्धाश्रमाकडून सांगण्यात आले. या वृद्धाश्रमात ३७ महिला आणि १३ पुरुष राहतात. राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पुनित आश्रमीय परिसरातच जीवनाचा अंत व्हावा, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन अनेकांनी सग्यासोयºयांना अव्हेरून आध्यात्मिक परिसर गाठला आहे. अनेक वृद्धांनी वयाची ८० वर्षे गाठली असून, रोज ध्यान, प्रार्थनेच्या प्रभावाने त्यांच्यात आध्यात्मिक ऊर्जा ओतप्रोत दिसून येते.
वयाच्या नव्वदीत अभ्यंग स्नानाने तरळले आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 9:45 PM
मांगल्याचा दिवाळी सण सर्वत्र आतषबाजीत सुरू असताना, रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेल्या, उपेक्षित वयोवृद्धांना वयाच्या नव्वदीत अभ्यंगस्नान आणि सुगंधी उटण्याने स्नान घातल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या पुढाकाराने हा उपक्रम शुक्रवारी पार पडला.
ठळक मुद्देसंघटनांकडून भरभरून प्रतिसाद : सामाजिक उपक्रमातून वृद्धाश्रमात रोजच ‘दिवाळी’