शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मेडिकल कॉलेजला एनएमसीची मंजुरी ; मात्र ‘ओपनिंग’ला रेड सिग्नल

By उज्वल भालेकर | Updated: July 8, 2024 20:01 IST

आवश्यक टीचिंग स्टाफची त्रुटी, महाविद्यालयांना अपीलसाठी १५ दिवसांचा अवधी

अमरावती : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) ६ जुलै रोजी देशभरातील ११३ नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाचा देखील समावेश आहे. परंतु शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून महाविद्यालय सुरू करण्यासदेखील एनएमसीने काही त्रुटी दाखवत नकार दिला आहे. त्यामुळे या त्रुटीच्या अनुषंगाने अपिल करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १५ दिवसांचा अवधीदेखील देण्यात आला आहे.

राज्य शासनाने १७ जुलै २०२३ मध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये अमरावतीमधील वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील समावेश होता. यानंतर लगेच १ ऑगस्ट २०२३ रोजी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढील कामकाजाला गती मिळण्यासाठी अधिष्ठाता यांची नियुक्तीदेखील केली होती. एनएमसीच्या निर्देशानुसार सर्व परवानगी मिळविणेदेखील सुरू झाले होते. अखेर एनएमसीने ६ जुलै रोजी एका परिपत्रकाद्वारे देशभरातील ११३ मेडिकल कॉलेजला मान्यता दिली असून, यामध्ये अमरावती मेडिकल कॉलेजचाही समावेश आहे.

परंतु, याबरोबरच एनएमसीने काही त्रुटी नोंदवत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून महाविद्यालय सुरू करण्यास रेड सिग्नल दिला आहे. यामध्ये सर्वांत मोठी त्रुटी ही आवश्यक टीचिंग स्टाफची दर्शविण्यात आली आहे. त्याच बायोमेट्रिक प्रणालीदेखील सुरू झालेली नाही. त्यामुळे एनएमसीने वैद्यकीय महाविद्यालयांना त्रुटीच्या अनुषंगाने अपिल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. तसेच त्रुटी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर देखील प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.----------------------------------अमरावती मेडिकल कॉलेजच्या जागेचा वादही कायमअमरावती मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी राज्य शासनाने बडनेरानजीक असलेल्या मौजा अलियाबादला देखील शासकीय जागा मंजूर केली आहे. परंतु, या जागेच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू झाला आहे. सदर महाविद्यालय हे आपल्या मतदारसंघामध्ये सुरू होण्याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर मंजूर केलेल्या जागेवरील वीटभट्टीधारक देखील कोर्टात गेल्याने त्यावर अजूनही निर्णय होणे बाकी आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय