धामणगाव गढी वनविभाग नाक्यावरूनच प्रवेशबंदी, वाहनांच्या लागल्या रांगा
फोटो मेलवर पाठवले आहे
फोटो कॅप्शन - धामणगाव गढी नाक्यावरून नो एन्ट्री दिल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या.
परतवाडा : चिखलदरा पर्यटनस्थळावर शनिवार-रविवारी जाणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पूर्वी चिखलदरा नगर परिषदेच्या नाक्यावरून बंदी असताना, शनिवारी मात्र धामणगाव गढी येथील वनविभागाच्या नाक्यावरूनच पर्यटकांना परतविण्यात आले. त्यामुळे एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोरोना नियमावली पाहता सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे आदेश असून शनिवार-रविवार सर्वत्र जीवनावश्यक प्रतिष्ठाने वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बाजारपेठच बंद असल्याने शासकीय नोकरदार, व्यापारी सर्वांची धूम नजीकच्या पर्यटनस्थळाकडे असते. शनिवार-रविवारी या दोन दिवस चिखलदरा व मेळघाट पर्यटनासाठी शेकडो पर्यटक येतात. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, पर्यटनस्थळावर शनिवार-रविवारी प्रवेश बंद करण्यात आला आहे.
बॉक्स
दोन्ही नाक्यावरून नो-एन्ट्री, चोरमार्गाचा वापर
शनिवारी पहाटे ७ पासूनच परतवाडा- चिखलदरा मार्गावर वनविभागाच्या धामणगाव गढी येथील नाक्यावरून पर्यटकांना पुढे प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे एक किलोमीटरपेक्षा अधिक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काहींनी चिखलदरा जाण्यासाठी धामणगाव गढी गावातून मल्हारा मार्गे प्रवेश घेतला. त्यांना चिखलदरा येथील नगरपालिकेच्या पर्यटक नाक्यावरून परत पाठविण्यात आले. त्यामुळे संताप व्यक्त करीत पर्यटक आल्यापावली परतले.
कोट
कोरोना नियम पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शनिवार-रविवारी या वीकेंडच्या दिवशी पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा