शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ना शपथ; ना दक्षता! सप्ताहाचा बोजवारा

By admin | Published: November 08, 2016 12:11 AM

भ्रष्टाचाराविरुद्धच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा यंदा बोजवारा उडाला.

विभागप्रमुख अनभिज्ञ : नागरिकांमध्ये जनजागृतीही नाहीअमरावती : भ्रष्टाचाराविरुद्धच्या जनजागृतीच्या उपायांचा भाग म्हणून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा यंदा बोजवारा उडाला. केंद्रीय दक्षता आयोगाकडून दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन ३१ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत केले जाते. प्रत्यक्षात या सप्ताहादरम्यान ना शपथ घेतली गेली, ना कुठली दक्षता पाळली गेली. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ आॅक्टोबरला एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यभर शासकीय कार्यालयांमध्ये हा दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. बहुतांश विभागप्रमुख दक्षता सप्ताहाबाबत अनभिज्ञ दिसून आले.कार्यालयीन इमारतीच्या दर्शनी भागावर भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, अशी सूचना व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्थानिक कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक लिहिलेला कायमस्वरुपी फलक लावण्यात यावा, अशी मुख्य सूचना आहे.राज्यात २००० सालापासून दक्षता जागरुकता सप्ताह सुरुवात झाला. जनतेमध्ये भ्रष्टाचाराबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध झाल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ आॅक्टोबर या जन्मदिवसापासून एक आठवडा या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह (व्हिजिलंस अवेरनेस विक) आयोजन करण्यात यावे, अशा सूचना २२ आॅक्टोबर २००१ रोजी सामान्य प्रशासन विभागाने दिल्या होत्या. मात्र बहुतांश विभागांमध्ये केवळ उपचार म्हणून शपथ घेतल्या गेली. एखादे फलक लावून हा सप्ताह साजरा केल्याचे समाधान अधिकाऱ्यांनी मानले. (प्रतिनिधी)कार्यक्रमाला फाटाकार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावणे अपेक्षित असताना अपवाद वगळता हे फलक कुठेही लावण्यात आले नाहीत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असताना कार्यक्रमाला फाटा देण्यात आला. नागरिक दूरचराज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांना दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त करायचे, हे या सप्ताहातील महत्त्वपूर्ण कार्य. मात्र पुरेशा जनजागृती आणि प्रसिद्धीअभावी या सप्ताहाची उपयोगिता आणि भ्रष्टाचाराबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न कागदावर राहिला.