शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

दिवाळीत रेल्वे गाड्यात ‘नो रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सवानिमित्त घरी आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे गाड्यांमध्ये परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. बहुतांश गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक झळकत असल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर कसे रुजू व्हावे, ही चिंता सर्वांनाच सतावू लागली आहे.पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली आदी प्रमुख शहरांमध्ये रोजगार, नोकरी, उद्योगधंदे, ...

ठळक मुद्देपरतीच्या प्रवासात अडथळे : खासगी वाहतूकदारांकडून मनमर्जी वसूली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सवानिमित्त घरी आलेल्या चाकरमान्यांना रेल्वे गाड्यांमध्ये परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. बहुतांश गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक झळकत असल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर कसे रुजू व्हावे, ही चिंता सर्वांनाच सतावू लागली आहे.पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली आदी प्रमुख शहरांमध्ये रोजगार, नोकरी, उद्योगधंदे, कामानिमित्त असलेले अनेक जण दरवर्षी दिवाळी उत्सव घरी येऊन आप्तेष्टांसोबत साजरा करतात. दोन-चार दिवस दिवाळीत नातेवाइकांसोबत घालवून पुन्हा परतण्याचे ते बेत आखतात. मात्र, यंदा रेल्वे गाड्यांमध्ये गर्दीने उच्चांक गाठला आहे. मुंबई, पुणे आणि गुजरातकडे जाणाºया गाड्यांमध्ये पाय ठेवणेही कठीण आहे. अशातच एसटी बस कर्मचाºयांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचाही मोठा फटका गावखेड्यातून प्रवास करणाºयांंना सहन करावा लागत आहे. पुणे, मुंबई मार्गे जाणाºया रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ असे फलक आरक्षण खिडक्यांवर झळकू लागले आहेत. अमरावती-मुंबई एक्सप्रेस ३१ आॅक्टोबरपर्यंत ‘हाऊसफुल्ल’ आहे, तर नागपूर-पुणे गरीब रथचे पुढील दोन महिने आरक्षण नाही, असे संगणकावर दिसून येते. हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेस, मेल आणि हावडा- कुर्ला शालीमार एक्सप्रेसमध्ये सुद्धा आरक्षण नसल्याने मुंबई कशी गाठायची, हा पेच गावी आलेल्यांसमोर निर्माण झाला आहे.

प्रवाशांचे दिवाळे, दलालांची दिवाळी!पुणे, मुंबईला परतण्यासाठी २१ व २२ आॅक्टोबर रोजी आरक्षण मिळावे, यासाठी चाकरमान्यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत; मात्र मुंबईसाठी द्वितीय श्रेणीच्या आरक्षण तिकिटासाठी सुमारे २५०० ते ३००० रुपये मोजावे लागत आहेत. पैसे मोजूनही रेल्वे तिकीट मिळत नाही, असे विदारक चित्र आहे. यंदाची दिवाळी रेल्वे तिकीट दलालांसाठी लाभ‘लक्ष्मी’ ठरली असून प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.