लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर आली आहे.चिखलदरा पर्यटनस्थळावर १९ जुलैपासून संततधार पाऊस होत आहे. तालुक्याने हंगामात अतिवृष्टीही अनुभवली. तूर्तास संततधार पाऊस नसला तरी दाट धुके व ढगाळ वातावरणामुळे पर्यटकांसह स्थानिकांना सूर्यदर्शन झालेले नाही. या १८ दिवसांमध्ये २२ व २३ जुलै रोजी पावसाची नोंद नसली तरी ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसलाच नाही मान्सून चांगलाच बरसल्याने संपूर्ण मेळघाटातील नदी -नाले ओसंडून वाहू लागले आहेत. याच पावसामुळे अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा, शहानूर, सपन, पूर्णा प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे.चिखलदऱ्याची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्केपरिसराची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के एवढी असून, कमाल व किमान तापमान १९ ते२२ अंश सेल्सिअस असल्याची माहिती सिपना महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मंगळे यांनी दिली. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि दाट धुके पाहता, येथील बोचरी थंडी हुडहुडी भरवणारी ठरली आहे.१२३० मिमी पाऊस तलाव ओव्हरफ्लोचिखलदरा शहरात आतापर्यंत १२३० मिमी पावसाची नोंद अप्पर प्लेटो येथील पाटबंधारे विभागाच्या पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे. या केंद्रावरूनच अचलपूर येथील प्रकल्पाला सूचना दिल्या जातात. सक्कर तलाव, कालापाणी, बीरतलाव ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे.
१८ दिवसांपासून सूर्यदर्शन होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:04 AM
गेल्या १८ दिवसांपासून चिखलदरा पर्यटनस्थळावर सूर्याचे दर्शन झाले नाही. दिवसभर दाट धुके, कधी, तर क्षणात धो-धो कोसळणारा पाऊस या विलोभनीय दृश्यासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक येथे हजेरी लावत असताना पावसाळी वातावरणामुळे कपडे वाळत नसल्याची नवीन समस्या समोर आली आहे.
ठळक मुद्देचिखलदऱ्यात दाट धुके : निसर्गरम्य नंदनवनात वनसंपदा फुलली