लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या खड्डे दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील महापालिकेच्या अखत्यारीतील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येतील, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.मुख्य रस्ते, मोठे रस्ते व गणपती विसर्जन खड्डे दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, ते खड्डे जेट पॅचरने मशीनद्वारे बुजवावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी ११ जुलैला दिले होते. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले नाही.केवळ कागदोपत्री दोन ते तीन दिवस प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले. तथापि, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे जेटपॅचरचा दावाही निखालस खोटा ठरला.विशेष म्हणजे, महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे रस्त्यांवरील खड्ड्यांची कुठलेही आकडेवारी उपलब्ध नाही. केवळ तक्रारींच्या आधारे तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, पावसाने ती डागडुजी चव्हाट्यावर आणली आहे.अंतर्गत रस्त्यांची चाळणरविनगर ते छांगाणीनगर, राजापेठ ते देवरणकरनगर, देवरणकरनगर ते गणेश कॉलनी, कल्याणनगर ते मोतीनगर या काही अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असताना महापालिकेचा बांधकाम विभाग निद्रिस्त आहे.
ना सर्वेक्षण, ना जेट पॅचर खड्डे दुरुस्तीची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:14 AM
तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या खड्डे दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील महापालिकेच्या अखत्यारीतील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येतील, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.
ठळक मुद्देखड्डे ‘जैसे थे’ : महापालिका झोपेत