शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

ना लसीकरण, ना काँटॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:11 AM

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली, विशेष लक्ष देण्याची गरज अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोना ...

ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली, विशेष लक्ष देण्याची गरज

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातूनच काँटॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती मंदावल्याने आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गतवर्षी एप्रिल महिन्यात आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून येते. मात्र त्याबरोबरच ग्रामीण भागात काँटॅक्ट ट्रेसिंगची पाहिजे तशी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान २० ते ३० जणांची कोरोना चाचणी होणे अपेक्षित आहेत. मात्र, तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येते आहे. तथापि एका महिन्यापासून मागणीच्या तुलनेत व प्रमाणात लसीचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण मोहीम प्रभावी होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर मध्येदेखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा पुरेशी उपलब्ध नाही. काेरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट टेंसिंग व लसीकरणाला गती देणेही आवश्यक आहे.

बॉक्स

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गरजेचे !

१) ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव चांगलाच वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.एका कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील किमान २० ते ३० जणांची चाचणी करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

२)ग्रामीण भागात आजघडीला दैनंदिन ५०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. या सूत्रानुसार, ग्रामीण भागात दैनंदिन किमान ६ ते ८ हजार दरम्यान चाचण्या अपेक्षित आहेत. मात्र संपूर्ण जिल्ह्यातच दैनंदिन ५ हजार ते ५५०० चाचण्या होत असल्याचे दिसून येत आहे.

३) कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामीण यंत्रणेला चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर किती जण संपर्कात आले होते, याची व्यवस्थित माहिती संबंधित रुग्णांकडून मिळत नसल्याने ट्रेसिंगमध्ये अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

४) ग्रामीण भागातील रुग्णांचा गृहविलगीकरणावर सर्वाधिक भर आहे. मात्र, ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह शक्यतोवर अभाव असतो. त्यामुळे सौम्य लक्षणे असणारा रुग्ण कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर वावरत असल्याने इतरांनादेखील संसर्ग होण्याची शक्यता असते.

बॉक्स

लसीसाठी धावाधाव

प्राथमिक आरोग्य केंद्रांना आठवड्यातून दोनदा शंभर ते दीडशे डोस मिळत आहेत. कार्यक्षेत्रातील गावांच्या वाट्याला पन्नास-शंभर अशी येत असून यामुळे रस्सीखेच सुरू आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी वादावादीचे प्रसंग घडले आहेत. लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच लोक रांगा लावत आहेत. १८ ते ४० वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी आहे.

कोट

उपलब्ध लसीनुसार, ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. नागरिकांनीदेखील सहकार्य करून योग्य ती दक्षता घ्यावी.

- दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी

बॉक्स

ग्रामीण भागात एका दिवसात ३ हजारांवर चाचण्या

ग्रामणी भागात ११ मे रोजी आरोग्य विभागाने १४ तालुक्यांत ३ हजार ९७६ चाचण्या घेतल्या आहेत. यात अमरावती तालुक्यात २१३,भातकुली १९६,मोशी ३६७, वरूड ४३०, अंजनगाव सुर्जी ३२४, अचलपूर ३६८, चांदूर रेल्वे २३७, चांदूर बाजार २४७, चिखलदरा ३०१, धारणी २३४, धामणगाव रेल्वे ३२१, तिवसा २५९ आणि नांदगाव खंडेश्र्वर २३६ याप्रमाणे चाचणीचे नमुने घेण्यात आले आहेत.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण रूग्ण -७८५४८

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण -१०८५०

गृहविलगीकरणातील रूग्ण -८२०५

शहरातील रूग्ण -२९२६

ग्रामीण भागातील कोरोना रूग्ण -७६५६

बॉक्स

ज्येष्ठ नागरिक १६४२३०

४५ वर्षांपुढील -१०३४६६

फ्रंट लाईन वर्कर्स-३०७३४

आरोग्य कर्मचारी -३०२५५

१८ ते ४४- १५८३९

बॉक्स

तालुकानिहाय ग्रामीण भागातील टेस्टिंग,पॉझिटिव्ह

अमरावती १०९९३-२०१७ भातकुली १०३१५-११७९,मोशी २०५४२-३२५८

वरूड २१०८०-६१४२

अंजनगाव सुर्जी १८९३८-२८६०

अचलपूर ३३९६५-५४४३

चांदूर रेल्वे १३३०९-२०४९

चांदूर बाजार १७४५९-२२७४

चिखलदरा१०११७-११७४

धारणी १६१०९-२०९५

दर्यापूर २१४५२-१८९२

धामनगाव रेल्वे १८५१०-२३७१

तिवसा १८९१०-२६४१

नांदगाव खंडेश्र्वर १८०७९-१८०८