लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ३० आॅक्टोबरला हजारो भाविकांच्या उपस्थितीत गोपालकाला झाला. राष्ट्रसंतांचे क्रांतिकारक अभंग आणि ‘पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेवऽऽ तुकाराम’च्या गजरात राष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले गुरुदेवभक्त महिला-पुरुष व बालगोपालांनी गोपालकाला घेतला.गोपालकाल्याच्या कार्यक्रमाची सुरुवात नारायणदास पडोळे महाराज यांच्या कीर्तनाने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदीले, आ. कीर्तीकुमार भांगडिया, खा. आनंदराव अडसूळ यांची विशेष उपस्थिती होती. संचालक मंडळाचे अध्यक्ष एस.एन. सुब्बाराव, उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघडे, राजेश वानखडे, माजी खासदार विजय मुडे, माया चवरे, लक्ष्मणदास काळे महाराज, ज्ञानेश्वरराव मुडे, घनश्याम पिकले, सूर्यप्रकाश जयस्वाल, सहजानंद कडू, कांताप्रसाद मिश्रा, भानुदास कराळे, दिलीप कोहळे, विलास साबळे, प्रकाशक गोपाल कडू, ‘श्रीगुरुदेव’ मासिकाचे संपादक दीपक पुनसे यावेळी उपस्थित होते.नारायणदास पडोळे महाराज यांना भास्करराव इंगळकर, साहेबराव कन्हेरकर, भाष्करराव काळे, रघुनाथ कर्डीकर, नरेंद्र माहुलकर, श्रीकृष्ण दळवी, शीतल मांडवगडे, श्रीकृष्ण झगेकर, श्रीकांत भोजने, बाळाभाऊ बेलनकर, वासुदेव हजारे यांनी साथसंगत केली. आयोजनासाठी श्रीगुरुदेव अध्यापक विद्यालय, श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय, श्रीगुरुदेव विद्यामंदिर, मानवसेवा छात्रालय, श्रीगुरुदेव समता वसतिगृह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.‘आरती राष्ट्रसंता। जगद्गुरू कृपावंता’ या महाआरतीनंतर गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. गुरुदेवभक्तांसह आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक गुरुकुंजात उपस्थित झाले होते. प्रत्येकापर्यंत गोपालकाला पोहोचावा अशी नियोजनबद्ध तरतूद संयोजकांनी यावेळी केली होती. समारोप राष्ट्रवंदनेने झाला.व्यायाम संमेलनराष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्यायाम संमेलनात डवरगावची श्रीगुरूदेव व्यायामशाळा, अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, शिरजगाव मोझरी येथील श्रीगुरुदेव व्यायामशाळा, मोझरी येथील हनुमान व्यायामशाळा येथील विद्यार्थ्यांनी व्यायाम प्रात्यक्षिके व कसरतीचे थरारक खेळ दाखविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे होते. सदानंद यादव, अशोक देशमुख, किसन देशमुख हे उपस्थित होते. व्यायाम संमेलनाचे आयोजन रायजीप्रभू शेलोटकर, डॉ. मेघराज कोचर, सद्गुण ठोसर यांनी केले.
राष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाचा गोपालकाल्याने समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:38 PM