शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

तलाठ्यांचा शासनाशी असहकार

By admin | Published: September 10, 2015 12:10 AM

शासनाचे आदेश, परिपत्रकाप्रमाणे संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ...

अमरावती : शासनाचे आदेश, परिपत्रकाप्रमाणे संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने ग्रामीण महसुली कामकाज ठप्प पडले आहे. सुवर्ण जयंती अभियानात सेवानिवृत्त प्रकरणे, सेवापुस्तके अद्ययावत करण्या संदर्भातील तलाठ्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. दुष्काळ, गारपीट व अतिवृष्टी निधीवाटपाचा मेहनताना तहसीलदरांनी काढला. परंतु तलाठ्यांना दिलेला नाही. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या निर्णयाप्रमाणे प्र्रमाणे १,२७५ रुपये प्रवासभत्ता देण्यात आलेला नाही, ज्येष्ठता यादी १ जानेवारी पासून प्रसिध्द केलेली नाही. मात्र, कनिष्ठ लिपिकांच्या अव्वल कारकुन पदावर पदोन्नती २ महिन्यांपूर्वीच केल्या आहेत. तसेच संगणकाच्या कामाकरिता ४ जून १९९८ नंतर वयाची ४५ वर्षे पूर्ण करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अद्याप आॅपरेटर मदतनीस दिलेला नाही. तलाठी कार्यालय मालकाला शासनाने भाडे मंजूर केले आहे. हे भाडे अद्यापही देण्यात आलेले नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिने उशिरा होते. आदी मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा अमरावतीव्दारा असहकार आंदोलन पुकारल्याचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मदापुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)