शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

अंबानगरीत पत्रकारांचा मूकमोर्चा

By admin | Published: October 03, 2016 12:12 AM

राज्यातील पत्रकारांवर रोेज होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामुळे पत्रकारांचे जीणे धोक्याचे झाले आहे

शेकडोंची उपस्थिती : पत्रकारांच्या सुरक्षेसाठी संरक्षण कायदा करण्याची मागणीअमरावती : राज्यातील पत्रकारांवर रोेज होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामुळे पत्रकारांचे जीणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी विविध मागण्यांसंदर्भात रविवारी मराठी पत्रकार परिषद मुंबईव्दारा संलग्नित, अमरावती जिल्हा पत्रकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांनी शातंतेच्या मार्गाने मूकमोर्चा काढून काळे कपडे परिधान करून व हाताला काळ्या फिती बांधून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधले. हा मूकमोर्चा सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौक, मार्ग इर्विन चौकात पोहोचला. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार्रापण करण्यात आले. यानंतर विविध मागण्यांचे फलक घेऊन सर्व सहभागी पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनी पत्रकारांची मागणी त्वरित शासनाकडे पोहोचविण्यात येईल व मी यासंदर्भात स्वत: वरिष्ठांशी चर्चा करतो, असे आश्वासन दिले. यावेळी आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, आ.अनिल बोंडे आदी उपस्थित होते. भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच संरक्षण कायदा करू, आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देऊ, असे असे आश्वासन भाजपच्यावतीने नागपूर येथे पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने काढलेल्या मोर्चाच्या वेळी देण्यात आले होते. तो शब्द सरकारने पाळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. या मोर्चात अनिल अग्रवाल, विलास मराठे, गणेश देशमुख, उल्हास मराठे, विजय ओडे, चंदू सोजतीया, त्रिदीप वानखडे, पद्मेश जयस्वाल, भारत थोरात, सुुनील धर्माळे, संजय बनारसे, चंद्रप्रकाश दुबे, सुरेंद्र चापोरकर, संजय मापले, पराग गनथडे, योगेश देवके, वैभव बाबरेकर, संदीप मानकर, जितेंद्र दखने, संजय शेंडे, यशपाल वरठे, चेतन ठाकूर, अरुण जोशी, मनीष तसरे, शाहीद खान, मनीष जगताप, बंडू नागरे, अक्षय नागपुरे, खोजया खुर्रम, सुनील तळोकार, महेश कथलकर, नयन मोंडे, नासीर हुसैन, यांच्यासह विविध वृत्तपत्र प्रतिनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी छायाचित्रकार व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. तसेच मोर्शी, धामणगाव, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, परतवाडा, अंजनगाव सुर्जी, वरूड, तिवसा व भातकुली तालुक्यात मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)दर्यापुरातही मूकमोर्चादर्यापूरातही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी दर्यापूर पत्रकार संघ व प्रेस क्लबच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय कदम, शशांक देशपांडे, विजय बरगट, गजानन देशमुख, एस. एस. मोहोड, अनंत बोबडे, किरण होले, धंनजय धांडे, सचिन बोदळे, गजानन चौरपगार, सोपान गौंडचौर अजय शर्मा, रवि नवलकार उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर येथे मोर्चारविवारी विविध मागण्यासंदर्भात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही मुक मोर्चा काढण्यात आला. येथील नांदगाव खंडेश्वर तालुका पत्रकार संघच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नंदकिशोर इंगळे, मनोज मानतकर, अथर खान, श्याम शिंदे, संजय पोकळे, विशाल ढवळे, सुनील तायडे, भागवत ब्राम्हणवाडे, अरुण शिंदे, प्रदीप जोशी, विवेक पाठक, संजय जेवडे, विनेश बेलसरे, जितेंद्र आखरे, वासुदेव गावंडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.