शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पिंपळखुटा येथील आश्रमशाळा नव्हे, विद्यार्थ्यांचा कोंडवाडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 1:32 AM

आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित अचलपूर तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांसाठी सुविधा बेपत्ता आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी येथे उघड्यावर आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे, निकृष्ट जेवण हेच आहे. शासनाचे आतापर्यंत कोट्यवधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे वास्तव चौकशी समितीपुढे आले.

ठळक मुद्देनाल्याचे दूषित पाणी विहिरीत : लाखोंचे अनुदान, सुविधा बेपत्ता; नेत्यांसाठी कमाईचे साधन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित अचलपूर तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांसाठी सुविधा बेपत्ता आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी येथे उघड्यावर आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे, निकृष्ट जेवण हेच आहे. शासनाचे आतापर्यंत कोट्यवधीचे अनुदान हडपण्याचा प्रकार येथे सुरू असल्याचे वास्तव चौकशी समितीपुढे आले. या समितीला सर्व सुविधा बेपत्ता आढळून आल्या.माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटीच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला लाखो रुपयांचे अनुदान शासनातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यासाठी दिले जाते. मात्र, कुठल्याच सुविधा उपलब्ध न करता आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो रुपयांची लूट सुरू आहे. लोकप्रतिनिधींनीच आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे करून लुटमार चालवल्याने इतरांचे काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आश्रमशाळा संहितेनुसार कुठल्याच सुविधा येथे दिल्या जात नसल्याचे संतापजनक चित्र आहे. गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांनाही शासनाच्या कुठल्या सुविधा आपणास मिळतात, याची जाण नाही आणि याविरुद्ध शिक्षकांपुढे बोलण्याची हिंमत होत नसल्याने ३० वर्षांपासून हा अपहार सुरू आहे. राजकीय ताकदीवर आपले कोणी काहीच करू शकत नाही, याचा गर्व शासकीय आश्रमशाळेचे संपूर्ण नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची पोलखोल समितीने केली.कोंडवाड्यात झोपा, उघड्यावर आंघोळआदिवासी आश्रमशाळा संहितेनुसार विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंग, गादी, उशी, चादर, पेटी आदी साहित्य देणे क्रमप्राप्त आहे. परंतु, हे आदिवासी विद्यार्थी दोन टिनाच्या ओसरीत जमिनीवरच झोपत असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. प्रत्येकी २० स्नानगृह आणि शौचालय आवश्यक असताना, अपुºया संख्येतील स्नानगृहावरही छत नाही.ही आहे समितीआदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे, तहसीलदार निर्भय जैन व तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण कोरडे या समितीत आहेत. त्यांनी पिंपळखुटा आश्रमशाळेत शिकणाºया शिशुपाल सुनील बेलसरे या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी केली.नाल्याचे दूषित पाणी विहिरीतदत्तप्रभू आश्रमशाळेच्या भिंतीलगत नाला वाहतो. त्याचे पाणी विहिरीत पडते. तेच पाणी विद्यार्थ्यांना थेट पिण्यासाठी दिले जाते. प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे यांनी गत महिन्यात सर्व आश्रमशाळांना पत्र देऊन सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यास बजावले होते. यासंदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता आदिवासी पालकांनी केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा