राजाराम झेंडे : जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा महोत्सवअमरावती : शासकीय कर्मचारी वेगवेगळ्या तणावाखाली असतात. निकोप काम करायचे असेल तर शरीर सुदृढ असले पाहिले. दैनंदिन काम करीत असताना व्यायामाचे महत्त्व आपण विसरू शकत नाही. तणावातून मुक्त होण्यासाठी शारीरिक खेळासारखा दुसरा विरंगुळा नाही, असे मत विभागीय आयुक्त कार्यालय आस्थापना विभागाचे उपायुक्त राजाराम झेंडे यांनी केले.जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, माया वानखडे, क्रांती काटोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, कुसुम चौधरी, शिवाजी शारीरिक महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एम.कडू, गटविकास अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, विशाल शिंदे, क्रीडा संयोजक गटशिक्षणाधिकारी नितीन उंडे, गंगाधर मोहने, शोभा मावळे, संगिता सोनोने, रंजना बोके, डी.यू.गावंडे आदींची उपस्थिती होती. जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला मंगळवारपासून शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरूवात झाली. महोत्सवात जिल्ह्यातील चौदाही पंचायत समितीतील शिक्षकांसह सुमारे २००० कर्मचारी सहभागी झाले आहेत. या दोनदिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेक्निक्वाईट टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, जलतरण आदी सांघिक खेळांसह धावणे, भालेफेक, गोलाफेक, लांब उडी, उंच उडी आदी वैयक्तिक खेळ होणार आहेत. सायंकाळी सहा वाजता भक्तीगीत, भावगीत, समूहनृत्य, एकल नृत्य, अभिनय, झांकी, नाटका, एकांकिका आदी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी क्रीडा संयोजक नितीन उंडे, गंगाधर मोहने य् जयकुमार कदम, कैलास कावनपुरे, प्रशांत गुल्हाने, मनोज खोडके, रवींद्र ढोके, सचिन वावरकर, चंद्रशेखर कोहळे, तिमय्या तेलंग, सतीश नांदणे, उज्वल पंचवटे, राजेश सावरकर, विनायक लकडे, राजेश बोंडे, अनिल वानखडे, नयन काळबांडे, सुनील पांडे, आशीष भुयार, अशोक शिंदे, सुधाकर नागे, वसंत तेलखेडे, विजय उभाड, पुकज गुल्हाने आदींनी प्रयत्न केलेत.
शारीरिक खेळासारखा विरंगुळा नाही
By admin | Published: February 08, 2017 12:38 AM