अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. मात्र, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान चाचणी लेखापरीक्षणात बॅंकेच्या गुंतवणुकीसाबाबत निदर्शनास आलेल्या मुद्द्यावर तत्कालीन अध्यक्षांसह २४ संचालक आणि तीन सनदी लेखापालांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आल्याने वातावारण तापू लागले आहे. गुंतवणूक करताना गैरव्यवहार झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
----------------------------
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी बुधवारी मुलाखती
राज्यपाल करणार नव्या नावांची घोषणा, पाच जणांची यादी राजभवनात पोहोचली
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आठव्या कुलगुरुपदासाठी ८ सप्टेंबर रोजी
मुलाखती घेण्यात येणार आहे. यात कुलगुरुपदासाठी समितीने निवडलेल्या अंतिम पाच जणांची यादी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
निवड समितीने शॉर्ट लिस्टनुसार डॉ. दीपक धोटे (अमरावती), डॉ. उमेश कदम (दिल्ली), डॉ. कारभारी काळे (औरंगाबाद), डॉ. दिलीप मालखेडे (दिल्ली), डॉ. नंदकिशोर ठाकरे (मानोरा, वाशिम) या पाच जणांच्या मुलाखती होणार आहेत.