धामणगाव रेल्वे (अमरावती) - चारित्र्यावर संशय घेत, छळ करण्यासाठी पत्नीच्या चेहºयावर सिगारेटचा धूर सोडणाºया दारुड्या पतीला धामणगावच्या न्यायालयाने गुरुवारी कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी व्हॉट्सअॅपवर नोटीस बजावली. त्यात १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.तालुक्यातील तळेगाव दशासर येथे राहणाºया एका महिलेचा अमरावती येथील प्रीतेश बाळासाहेब देशमुख याच्यासोबत २४ जून २०१८ रोजी विवाह झाला. प्रीतेश हा ओमानची राजधानी मस्कत येथे मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याला पूर्वीपासून दारूचे व्यसन होते. विवाहानंतर तो चेहºयावर सिगारेटचा धूर सोडून छळ करीत होता. ‘तू बायको म्हणून मला पसंत नाहीस’ असे तिला सांगत असे. तसेच त्याने १० लाख रुपये व मोबाइल फोनची मागणी तिच्याकडे केली होती. या छळाला कंटाळून पीडित महिलेने धामणगाव येथील संरक्षण अधिकारी कुलदीप गावंडे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी लेखी जबाब नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालय धामणगाव येथे हे प्रकरण दाखल केले.
पत्नीच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणाºयास व्हॉट्सअॅपद्वारे नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 5:30 AM