शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

 आदिवासी ‘व्हॅलिडीटी’त बोगसगिरी थांबेना, टकारीचे केले टाकणकार; अमरावतीच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने बजावली नोटीस

By गणेश वासनिक | Published: December 17, 2023 4:33 PM

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी विलास पुंडलिकराव गुल्हाणे यांच्या तक्रारीनुसार बुधासिंग बालचंदम झाकर्डे यांचे १४ जुलै २०१२ रोजी मृत्यू झाला आहे. 

अमरावती : राज्यात आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण मिळण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना बनावट कागदपत्राच्या आधारे ‘टकारी’चे ‘टाकणकार’ करून ‘व्हॅलिडीटी’ मिळविल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने रामेश्र्वर बुधासिंग झाकर्डे यांना नोटीस बजावून मूळ प्रत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी विलास पुंडलिकराव गुल्हाणे यांच्या तक्रारीनुसार बुधासिंग बालचंदम झाकर्डे यांचे १४ जुलै २०१२ रोजी मृत्यू झाला आहे. 

बुधासिंग झाकर्डे यांनी अमरावती येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त केलेले एमआरसी ८१ जामगाव/३१९/ २०१०-११ अन्वये ६ सप्टेंबर २०१० रोजीचे ‘टाकोणकार’ या अनुसूचित जामतीच्या जात प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करण्यासाठी तक्रारीसह आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत. ही कागदपत्रे ‘व्हॅलिडीटी’ समितीने पोलिस दक्षता पथकाकडे चौकशीकरिता पाठविली होती. यात चौकशी अहवाल बुधासिंग झाकर्डे यांच्या प्रकरणात जातीच्या नोंदी सन १९३२, १९३६, १९३९, १९४० आणि १९५८ या ‘टकारी’ प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बुधासिंग यांचे वारसदार असलेले रामेश्र्वर झाकर्डे यांना चौकशीअंती ‘टकारी’ नोंदी आढळून आल्याने अनावधाने जारी करण्यात आलेले ‘टाकणकार’जमातीचे वैधता प्रमाणपत्राची मूळ प्रत जमा करावी, असे निर्देश १३ ऑक्टोबर २०२३ रोजी अमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकांनी नोटीशीद्वारे दिले आहेत.

तक्रारीच्या अनुषंगाने रामेश्वर झाकर्डे यांच्या प्रकरणी पोलिस दक्षता पथकाच्या अहवालानुसार ‘टाकणकार’ जमातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द का करण्यात येवू नये अशी नोटीस बजावली आहे. तसेच हे प्रमाणपत्र कार्यालयात सेवा शाखेकडे जमा करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचे स्पष्ट होते. - शिवानंद पेढेकर, उपसंचालक तथा सदस्य सचिव(प्रभारी) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती, अमरावती. 

टॅग्स :Amravatiअमरावती