शेख समीर शेख सलीम हा धारणी गावाकडून मल्हारा गावाकडे दुचाकीने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परतवाडा ते धारणी रोडवर बुरडघाटपासून काही अंतरावर सापळा रचून त्याला थांबविले.
अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून फिरण्याची परवानगी असण्याबाबत त्यास विचारले. तेव्हा त्याच्याकडे परवानगी आढळून आली नाही. दुचाकीबाबत विचारले असता, ती दुचाकी मित्र जाकीर ऊर्फ जाकू (रा. परतवाडा) याचेसह गौरखेडा कुंभी येथून एक महिना अगोदर चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलीस स्टेशन परतवाडा आणि ब्राह्मणवाडा हद्दीतून व अमरावती शहरातून १२ ते १३ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. त्याचेकडून ७० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ही कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोलीस जमादार त्र्यंबक मनोहर, नायक पोलीस सुनील महात्मे, प्रमोद खर्चे, योगेश सांभारे, सय्यद अजमत, प्रवीण अंबाडकर, सायबरचे सागर धापड ,सरिता चौधरी, चालक पंकज वानखडे व नितेश तेलगोटे यांनी पार पडली.