अमरावती : पेट्रोल- डिझेलची दरवाढ रोज होत वाहनचालकांचे बजेट कोलमडले आहे. सोमवारी अमरावती शहरात पेट्रोल १०९.२७ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ९८.९३ रुपये प्रतिलिटर होते. त्यामुळे खासगी वाहनचालकांनी वाहन भाड्यात १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे व काही ठिकाणचे पर्यटन स्थळे बंद असल्याने त्याचा परिणाम खासगी वाहनचालक- मालकांवरसुद्धा पडला असून, वाहन खरेदीकरिता बँकांकडून काढलेल्या कर्जाचे हप्तेसुद्धा थकले आहेत. नियमित हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. नियमित वाहनचालकांना भाडेसुद्धा मिळत नसल्यामुळे खासगी वाहन क्षेत्रात काम करणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावे, विशेष मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
बॉक्स
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (प्रतिलिटर)
पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१९ ७५.५६ ६६.८६
फेब्रुवारी २०२० ७६.५७ ६६.५१
जानेवारी २०२१ ९१.८३ ८१.५३
ऑगस्ट २०२१ १०९.२७ ९८.९३
प्रवासी वाहनांचे दर
वाहनांचा प्रकार दर
स्वीप्ट डिझायर १२ रूपये
इन्विहा १६ रुपये
टेम्पो ट्रॅव्हल २३ रुपये
तवेरा १४ रुपये (प्रतिकिमी)
गाडीचे हप्ता कसा भरणार?
कोट
पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे खासगी वाहनांचे दर वाढवावे लागले. सध्या मंदिरे बंद असल्याने प्रवासी नाहीत. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडला. बँकेचे हप्ते थकले. ईएमआय कसे भरायचे ही चिंता आहे.
- सुजीत खांडे,
चालक- मालक अमरावती
कोट
सध्या पाहिजे तसे प्रवासी भाडे मिळत नाही. वाहनाचे इन्सुरन्स व टॅक्स भरावाच लागतो. नागरिकांनी यंदा स्वत:ची वाहने विकत घेतल्यामुळे भाडे मिळत नाही. सध्या खासगी वाहन व्यावसायिकांना अच्छे दिन नाहीत.
- नितीन मोहोड,
चालक- मालक अमरावती.
कोट
पेट्रोल- डिझेलची भाववाढ करून शासानचे सामान्य लोकांना लुटारू धोरण सुरू आहे. नोटबंदीनंतर अर्थ व्यवस्था बिघडली. त्याचा फटका सामान्य लोकांना बसला शासन आता पेट्रोल- डिझेलचे भाववाढ करून त्यातून महसूल गोळा करीत आहेत.
- प्रदीप चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अमरावती