महसूल विभागाचा निर्णय : पोलिसांचे सहकार्य घेणारअमरावती : शहर, ग्रामीण भागात वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. सोमवारी वलगाव येथे धाडसत्र राबवून १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. मंगळवारपासून शहर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाळू साठ्यांवर कारवाई के ली जाणार आहे. अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केल्यानंतर महसूल विभागाने वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी गित्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी गित्ते बाहेरगावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलली. परंतु महसूल विभागाने सोमवारी वाळू साठ्यांची पाहणी केली असून या साठ्यांवर मंगळवारपासून कारवाईची मोहीम सुरु केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बडनेरा शहरातील पाच वाळूसाठे लक्ष्य करण्यात आले असून सकाळच्या सुमारास हे साठे जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या ४७ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया गुरुवारी राबविण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या जातील. जिल्हाधिकारी बाहेरगावी गेल्यामुळे सोमवारी पोलीस प्रशासनासोबत असलेली बैठक पुढे ढकलली. मात्र, वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. लवकरच वाळू तस्करांवर लगाम लावण्यात येईल.- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.वाळूसाठ्यांचा गुरुवारी लिलावशहरात काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव गुरुवार ३ सप्टेंबर रोजी केला जाणार आहे. ४७ वाळूसाठ्यांपैकी १० साठ्यांचा लिलाव यापूर्वी करण्यात आला असून उर्वरित वाळूसाठ्यांच्या लिलावाची प्रक्रिया गुरुवारी पार पडणार आहे. नव्याने होणाऱ्या लिलावात नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाळू माफियांसाठी आता ‘अॅक्शन प्लॅन’
By admin | Published: August 31, 2015 11:56 PM