अमरावती : यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यात प्रश्नपत्रिकेच्या कृती पत्रिकेवर भर देण्यात आला आहे. यामुळे येथे दहावी लेखी परीक्षेला इंग्रजी व गणित या विषयांची बहुसंच प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. इंग्रजी व गणित विषयासाठी आता एकच प्रश्नपत्रिका राहणार असल्याचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत सुरू करण्यात आली. त्यात इंग्रजी आणि गणित या विषयासाठी अ,ब, क आणि ड असे प्रश्नसंच असायचे. मात्र, यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयासाठी एकच प्रश्नपत्रिका कृती पत्रिका राहणार आहे. दहावीचा बदललेला अभ्यासक्रम कृतिशील आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे.परीक्षेत कॉपी होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत राज्य परीक्षा मंडळाने प्रश्नपत्रिकांची पद्धत बंद करून अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावादी धोरणानुसार महत्त्वपूर्ण बदल केला आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत लागू असेल, असेही मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अभ्यास मंडळ सदस्यांच्या अभिप्रायानंतर हा बदल करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या आकलनावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे कृती पत्रिका सोडावाव्या लागणार आहेत. परीक्षेत पाठांतरावर आधारित प्रश्न विचारले जाणार नसल्याने पुनरावृत्ती होणार नाही, असेही बोर्डाने कळविले आहे. दरम्यान, कॉपी रोखण्यासाठी याआधीच विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता मात्र कृती पत्रिकेत सर्व प्रकरणांवर आहेत
आता दहावीच्या परीक्षेत कॉपी अशक्य, कृतिपत्रिकेचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 10:22 PM