अमरावती : कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर उपयायोजनांची अंमलबजवाणी आरंभली आहे. शाळा, महाविद्यालयांना २८ फेब्रुवारीपर्यत टाळे असणार आहे. असे असले तरी जिल्हाभरातील शासकीय, खासगी व अनुदानित शाळांचे शिक्षक, शिक्षकेर कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणेने आधी हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. तूर्तास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कधी लस देणार, हे निश्चित झाले नाही. मात्र, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले होते.
काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. येत्या काही दिवसांत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे.
-------------
कोट
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वंतत्रपणे कोरोना लसीकरण दिले जाणार आहे. त्यानुसार कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी १२ फेब्रुवारीपर्यंत आटोपली आहे. आरोग्य यंत्रणेकडे डेटासुद्धा उपलब्ध झाला आहे. तालुकानिहाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अमरावती.
-----------------------
पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
तालुका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
अचलपूर १२२९ ३३८
अमरावती ८६० २५१
अंजनगाव सुर्जी ६८९ २५०
भातकुली ३९३ ३००
चांदूर बाजार ११५७ ४००
चिखलदरा ६०५ १४४
चांदूर रेल्वे ३९५ ६४
दर्यापूर ७८४ २८३
धारणी ७१६ १६८
धामणगाव रेल्वे ५६८ १५२
मोर्शी ६९५ १८२
नांदगाव खंडेश्वर ६१३ २५४
तिवसा ३७८ १९१
वरूड ८१४ २५९
अमरावती महापालिका २९५७ ६८७