एकाच छताखाली शिक्षण संस्था : अॅस्पायर एज्युकेशन फेअर १० जूनपासूनअमरावती : आपल्या पाल्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत आहेत. याशिवाय सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी फिरावे लागणार. यात श्रम, वेळ आणि पैसा जाणार. याची दखल घेत लोकमत ने लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर चे आयोजन केले आहे.या प्रदर्शनात सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामुळे आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता नको. विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन ठरणार आहे. तसेच या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे.शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या लोकमत समूहा तर्फे यंदाही अॅस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ जून आर्ट ग्रॅलरी, सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड,अमरावती येथे सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत भव्य शैक्षणिक प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनात पालक व विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकांचे निराकरण होणार आहे.याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालयाचे, शाळा, मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटेरियल डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटीलीटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्युट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी राजेश मालधुरे ९८८११२२३००, जयंत कौलगीकर ९९२२४२७७९४ यांच्याशी संकर्प साधावा. (प्रतिनिधी)
आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता नको
By admin | Published: June 08, 2016 12:10 AM