शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

आता प्रभागात प्रत्येकी दोन महिला-पुरूष उमेदवार

By admin | Published: May 12, 2016 12:08 AM

राज्यात मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये सन-२०१७ मध्ये होऊ घातलेली निवडणूक बहुसदस्यीय प्रणालीने घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्य शासनाने घेतला आहे.

महिला आरक्षण कायम : एकाच वेळी निवडणार चार नगरसेवक अमरावती : राज्यात मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये सन-२०१७ मध्ये होऊ घातलेली निवडणूक बहुसदस्यीय प्रणालीने घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्य शासनाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असे समीकरण राहणार असून ५० टक्के महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेत २२ प्रभागात सार्वत्रिक निवडणूक होण्याचे संकेत आहेत.एप्रिल २०१६ मध्ये नगरपरिषद, महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने राज्य मंत्रीमंडळासमोर आणला होता. या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली होती. यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. या समितीने महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेची शिफारस केली होती. या प्रस्तावाला मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यासंर्दभातील वटहुकूमही लवकरच जारी केला जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे महापालिकेतील मतदारांना एकाच वेळी चार नगरसेवक निवडता येणार आहेत. सध्या अमरावती महापालिकेत ४३ प्रभागात ८७ सदस्य संख्या आहे. मात्र, येत्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणालीने निवडणुका घेण्याचे ठरविण्यात आल्यामुळे २२ प्रभागात निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार २१ प्रभागात चार तर एका प्रभागात तीन नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडेल. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होईल. अपक्षांची संख्या रोडावणार२०१७ मध्ये होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रणालीने पार पडली तर निश्चितपणे अपक्ष नगरसेवकांची संख्या रोडावणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एका प्रभागात २५ ते २८ हजारापर्यत लोकसंख्या राहणार आहे. परिणामी प्रभागात अधिक संख्येने मतदार राहणार असल्यामुळे अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत मजलगाठले कठीण होणार आहे. राजकीय पक्षासाठी बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली पोषक असल्याचे दिसून येते.