लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाविरूद्ध लढाई लढणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना साथ देण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात मानवविरहित रोबोटिक ट्रॉली दाखल झाली आहे.कोविड केअर रुग्णालयात दाखल रूग्ण, नागरिकांपासून इतर सहायक वैद्यकीय कर्मचाºयांना संसर्ग होऊ नये, यासाठी मानवी स्पर्श न होता, मोबाइलद्वारे आॅपरेट होणारी रोबोटिक ट्रॉली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. सदर रोबोटिक ट्रॉलीतून एकाच वेळी १२ रुग्णांना औषधी, नाश्ता व जेवणाची डिश आदी पाठविता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया मानवविरहीत असल्याने इतर कर्मचाºयांना कोरोनाबाधितांच्या जवळ न जाता त्यांना आवश्यक औषधी, जेवण, नाश्ता पोहचविणार आहे. ही रोबोटिक ट्राली शनिवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरला हस्तांतरित करण्यात आली. मराठी विज्ञान परिषदेचे संचालक प्रवीण गुल्हाने यांच्या तांत्रिक सहकार्यातून ट्रॉली पूर्ण करण्यात आली.महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या सहकार्यातून रोबोटिक ट्रॉली तयार करण्यात आली आहे. कोविड सेंटर, रुग्णालयात रोबोटिक ट्रॉलीद्वारे रुग्णांना तसेच या ठिकाणी येणाºया व्यक्तींना मेडिसीन, नाश्ता, जेवण पोहोचविण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाºयांना याची मदत होणार आहे.- अमोल येडगेमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदआरोग्य यंत्रणा अहोरात्र झटतेयकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. राज्यातील काही ठिकाणी कोरोना रुग्णांची तपासणी, उपचार व अन्य कामे करताना आरोग्य कर्मचारीच या विषाणू संसर्गाच्या विळख्यात सापडले. अशा स्थितीत आरोग्य विभागाची यंत्रणा बाधित रुग्णांना धोका टाळण्यासाठी रोबोट ट्रॉली मदतगार ठरेल.
कोरोनाच्या लढ्यात आता रोबोटची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:00 AM
कोविड केअर रुग्णालयात दाखल रूग्ण, नागरिकांपासून इतर सहायक वैद्यकीय कर्मचाºयांना संसर्ग होऊ नये, यासाठी मानवी स्पर्श न होता, मोबाइलद्वारे आॅपरेट होणारी रोबोटिक ट्रॉली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहे. सदर रोबोटिक ट्रॉलीतून एकाच वेळी १२ रुग्णांना औषधी, नाश्ता व जेवणाची डिश आदी पाठविता येणार आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीडीएमसी रुग्णालयाला हस्तांतरित