लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या ‘लालपरी’ची रुतलेली चाके आता धावू लागली आहे. आतापर्यंत अपूर्ण क्षमतेने धावणाऱ्या बसमधून आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून याबाबतचे आदेश काढले असून, जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. विभागातील ८ आगारांमधून सध्या जवळपास ४०० बसफेऱ्या धावत आहेत. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवाशांनी प्रवास करणेबाबत नियम असल्याने काही मार्ग सोडले तर अनेक मार्गावर एसटी तोट्यात जात होती. त्यामुळे नुकसान होत होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे एसटीला फायदा होणार आहे. विभागीय नियंत्रकांनी अमरावती, बडनेरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे, दर्यापूर या आठ एसटी आगारांमधून पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे.पाच महिने थांबली होती चाकेकोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तब्बल पाच महिन्यांपासून लालपरी बंद ठेवल्याने महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत संपले होते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी प्रवासी सेवेसोबतच महामंडळाला मालवाहतूक सुरू करावी लागली.राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस आता पूर्ण प्रवाशी क्षमतेने चालविण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार विभागातील आठही आगारांमधून २२ ऐवजी पूर्ण क्षमतेने बसव्दारे प्रवासी वाहतूक केली जात असून, प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर वापर अनिवार्य केले आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रण
आता लालपरी धावू लागली पूर्ण क्षमतेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 5:00 AM
लॉकडाऊननंतर २० ऑगस्टपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली. पण तेव्हापासून प्रत्येक आसन क्षमतेचे निर्णयक्षमतेवर म्हणजेच प्रत्येक आसनावर एकच प्रवासी बसला पाहिजे, असा नियम घातला होता. त्यामुळे एसटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून पूर्ण सक्षमतेने एसटी बसेस धावत आहेत. प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्याला मास्क आणि सोबत सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.
ठळक मुद्देएसटी महामंडळ : जिल्ह्यातील आठ आगारांतून अंमलबजावणी